Jairam Dhongade

Jairam Dhongade

साहित्यिक-कवी-गझलकार-कादंबरीकार

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

White विचारधारा मोडीत काढले मी सारे विचार कोते... जे ठेवले कधीचे माझ्या उरात होते! तोंडावरी स्तुती अन् वळताच पाठ दुषणे... चांडाळ चौकडीला कंटाळतेच जोते! सांगू तरी कुणाला ऐकू तरी कुणाचे... भोळा नि भाबडा मी सारे चतूर श्रोते! साधेपणात गोडी गोडीत सौख्य सारे... पाठीवरी वहावे का ते फुगीर पोते! सत्कर्म साधनेवर ठेवून ठाम श्रद्धा... दृढभाव हाच आहे गण गण गणात बोते! जयराम धोंगडे ©Jairam Dhongade

#मराठीशायरी #Dosti  White विचारधारा

मोडीत काढले मी सारे विचार कोते...
जे ठेवले कधीचे माझ्या उरात होते!

तोंडावरी स्तुती अन् वळताच पाठ दुषणे...
चांडाळ चौकडीला कंटाळतेच जोते!

सांगू तरी कुणाला ऐकू तरी कुणाचे...
भोळा नि भाबडा मी सारे चतूर श्रोते!

साधेपणात गोडी गोडीत सौख्य सारे...
पाठीवरी वहावे का ते फुगीर पोते!

सत्कर्म साधनेवर ठेवून ठाम श्रद्धा...
दृढभाव हाच आहे गण गण गणात बोते!

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade

#Dosti

16 Love

पानगळ वाढत आहे चिंता आता पानगळीची... घुसमट भीती मनात असते वावटळीची! लागत नाही खरेच काही वृद्ध जिवाला... हवी जराशी विचारणाच बस कळकळीची! मरण्यासाठी जगण्याची तर कसरत सारी... प्रत्येकाची जिंदगीच ही धावपळीची! जीवनभर रंगाढंगाची प्यालो मदिरा... नशा तशी ना चवही कोठे जशी मळीची... व्हावे सारे मनासारखे वाटायाचे... उठाव मोर्चे चळवळ झाली बाब कळीची! जयराम धोंगडे ©Jairam Dhongade

#मराठीशायरी #leaf  पानगळ

वाढत आहे चिंता आता पानगळीची...
घुसमट भीती मनात असते वावटळीची!

लागत नाही खरेच काही वृद्ध जिवाला...
हवी जराशी विचारणाच बस कळकळीची!

मरण्यासाठी जगण्याची तर कसरत सारी...
प्रत्येकाची जिंदगीच ही धावपळीची!

जीवनभर रंगाढंगाची प्यालो मदिरा...
नशा तशी ना चवही कोठे जशी मळीची...

व्हावे सारे मनासारखे वाटायाचे...
उठाव मोर्चे चळवळ झाली बाब कळीची!

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade

#leaf मराठी शायरी नवीन

13 Love

White नाही आली गेली किती संकटे मी घाबरलो नाही... लढलो पडलो उठलो झटलो पण मी हरलो नाही! छोटे मोठे जे पडले ते काम करत मी गेलो... गोंधळलो चुकलो शिकलो पण कधी बिथरलो नाही! जे पोटी ते ओठी येते लबाड बोलत नाही... रुसले फुगले तुटले जुटले तरी कदरलो नाही! जे काही ते फार मिळाले असेच मानत आलो... गाडी माडी पाहून कुणाची मी झुरलो नाही! जे जे कळले ते ते लिहिले मनमोकळेपणाने... साधे सोपे सरळ मांडले कधी घसरलो नाही! जयराम धोंगडे (9422553369) ©Jairam Dhongade

#मराठीशायरी #sad_quotes  White नाही


आली गेली किती संकटे मी घाबरलो नाही...
लढलो पडलो उठलो झटलो पण मी हरलो नाही!

छोटे मोठे जे पडले ते काम करत मी गेलो...
गोंधळलो चुकलो शिकलो पण कधी बिथरलो नाही!

जे पोटी ते ओठी येते लबाड बोलत नाही...
रुसले फुगले तुटले जुटले तरी कदरलो नाही!

जे काही ते फार मिळाले असेच मानत आलो...
गाडी माडी पाहून कुणाची मी झुरलो नाही!

जे जे कळले ते ते लिहिले मनमोकळेपणाने...
साधे सोपे सरळ मांडले कधी घसरलो नाही!

जयराम धोंगडे (9422553369)

©Jairam Dhongade

#sad_quotes

14 Love

उतारा शासकाचा गुंडवृत्तीला दरारा पाहिजे... कायद्याला कायद्याची ठोस धारा पाहिजे! माणसाला फोन इंटरनेटचा डाटा हवा... भेटले तर अन्न कापड अन् निवारा पाहिजे! कोडगी झाली पिढी धुंदीत आहे आपल्या... नेमका पण टोमण्यांचा रोज मारा पाहिजे! बी बियाणे शेतसारा कर्ज आणिक नापिकी... राहिला शाबूत आता सातबारा पाहिजे! लेकबाळी पादचारी कामगारांच्या व्यथा... आज नाकर्तेपणावर या उतारा पाहिजे! जयराम धोंगडे (९४२२५५३३६९) ©Jairam Dhongade

#मराठीशायरी #happyteddyday  उतारा

शासकाचा गुंडवृत्तीला दरारा पाहिजे...
कायद्याला कायद्याची ठोस धारा पाहिजे!

माणसाला फोन इंटरनेटचा डाटा हवा...
भेटले तर अन्न कापड अन् निवारा पाहिजे!

कोडगी झाली पिढी धुंदीत आहे आपल्या...
नेमका पण टोमण्यांचा रोज मारा पाहिजे!

बी बियाणे शेतसारा कर्ज आणिक नापिकी...
राहिला शाबूत आता सातबारा पाहिजे!

लेकबाळी पादचारी कामगारांच्या व्यथा...
आज नाकर्तेपणावर या उतारा पाहिजे!

जयराम धोंगडे (९४२२५५३३६९)

©Jairam Dhongade

White मित्र मैत्री साधा धागा नाही... गाठ पडाया जागा नाही! सूत पोत अन् रंग बघाया... मित्र तसाही तागा नाही! चिडकी तर रक्ताची नाती... मैतर म्हणजे त्रागा नाही! बितंबातमी ठेवत असतो... कसा म्हणू तो जागा नाही! नाही कोणी मित्र जयाला... त्यासारखा अभागा नाही! जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade

#मराठीशायरी #international_youth_day  White मित्र

मैत्री साधा धागा नाही...
गाठ पडाया जागा नाही!

सूत पोत अन् रंग बघाया...
मित्र तसाही तागा नाही!

चिडकी तर रक्ताची नाती...
मैतर म्हणजे त्रागा नाही!

बितंबातमी ठेवत असतो...
कसा म्हणू तो जागा नाही!

नाही कोणी मित्र जयाला...
त्यासारखा अभागा नाही!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade

#international_youth_day मराठी शायरी मैत्री

15 Love

म्हणालो दुःखाला मी थांब म्हणालो... रहा जरासा लांब म्हणालो! मीच सोसला भार शिरावर... तरीही तुला खांब म्हणालो! नाकावरती राग तुझ्या पण... साधा भोळा सांब म्हणालो! यम आला तो समोर माझ्या... त्याला तिकडे डांब म्हणालो! लेचापेचा मुळीच नाही... खेळलोय मलखांब म्हणालो! जयराम धोंगडे ©Jairam Dhongade

#मराठीशायरी  म्हणालो

दुःखाला मी थांब म्हणालो...
रहा जरासा लांब म्हणालो!

मीच सोसला भार शिरावर...
तरीही तुला खांब म्हणालो!

नाकावरती राग तुझ्या पण...
साधा भोळा सांब म्हणालो!

यम आला तो समोर माझ्या...
त्याला तिकडे डांब म्हणालो!

लेचापेचा मुळीच नाही...
खेळलोय मलखांब म्हणालो!

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade

Extraterrestrial life

11 Love

Trending Topic