White भेद
शब्दवेडा किशोर
नर नारीत मांडला देह आकार वेगवेगळा
तोच चैतन्य उत्सव भिन्न रूपात नटला ||१||
तिला ठेवले चुलीला तो गेला रे शिकारीला
पेशी एक एक असे नियमात बांधलेला ||२||
त्याची वाढली ताकत तो रे झाला आक्रमक
तिचे वाढले कौशल्य तिला सृजनी कौतुक ||३||
मग झाले अवघड मूळ पदाला ते येणे
तिच्या माथी ये गुलामी तया स्वामीत्व जन्माने ||४||
त्याला सापडेना मूळ तिला सापडेना कुळ
शत सहस्त्र वर्षाचा मग चाले दुष्ट खेळ ||५||
रुप बंधन तिलाच योनी शुचिता वैभव
तो रे मात्र उधळे चौखूर नाही त्यासी कसला धरबंद ठाव ||६||
©शब्दवेडा किशोर
#माझ्या_लेखणीतून