White #अमर प्रेम
शब्दवेडा किशोर
त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते..त्याचं जरा जास्तच..तिच्यासाठी काय करु- काय नको असं त्याला झालेलं..पण त्याचा खिसा कायम फाटलेला..बिचारा..पण भलताच रोमॅटीक..तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे.तिला काहीतरी गिफ्ट द्यावं असं त्याला वाटायचं पण द्यायचं काय ? कारण फाटका खिसा..शेवटी न राहवून त्याने तिला रंगीत कागदी फुलं वाढदिवसाला गिफ्ट केली..ती खुश होती..पण जास्त नाही. तशीही तिची त्याच्याकडुन फार मोठी अपेक्षा नव्हती.तो जे देत होता त्यात ती समाधानी नसतानाही समाधान मानत होती.तो सामान्य घरातलाच..जेमतेम नोकरी..भविष्यात काही करुन दाखवेल असं काहीही त्याच्यात तिला दिसत नव्हतं पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते..तिच्यापेक्षा तो जरा जास्त.. मात्र एक दिवस सगळा नुरच पलटला..तो तिला म्हणाला,"तुझ्याबरोबर आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडत कुढत जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..?सारं काय आहे तुझ्याकडे..पण तरी माझ्याबाबत सतत दुजाभाव वाटतो मला तुझ्या वागण्यातून ? त्यापेक्षा मी परदेशी जातो..पुन्हा कधी परतणार नाही..मला असं वाटतं तु मला विसरुन पुढे जावं..आजपासुन आपले मार्ग निराळे..माझा-तुझा संबंध इथंच संपला."तो कायम निघुन गेला व ही जराशीच मोडून पडली..जणु सर्व काही संपले तिच्यासाठी..दिवस सरले व तिच्या मनातली दु:खाची लाट ओसरून संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..तिने ठरवलं..त्याने पैशासाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पैसे कमवुन दाखवायचे..इतके की आपल्या पुढे सारं जग त्याला थिटं दिसलं पाहीजे.पुढे या जिद्दीने पेटली ती व झोकुन दिलं स्वतःला..कष्ट केले..मित्रांनी मदत केली.अनेक चांगले वांगले लोक भेटले व तीचे दिवस पलटून ती खुप श्रीमत झाली..स्वतःची कंपनी, पैसा,नोकरचाकर,गाड्या,मान सर्व कमवलं.विरहाच्या आगीतुन व प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन ती बाहेर पडून जगण्यासाठी धडपडली व यशस्वीही झाली..पण तरी तिच्या मनात चुटपुट कायमच होती..तो सोडुन गेल्याची..त्यानं नकारल्याची व आपल्या अविचारी वागण्याची तसेच साधेपणा व गरीबीचा अपमान केल्याची..त्याच्यावरच्या प्रेमाची जागा कधीच तिरस्काराने घेतली होती.एक दिवस ती तिच्या आलिशान गाडीतुन जात असताना बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.गाडीच्या काचेतुन बाहेर पाहते तर म्हातारं जोडपं एकाच छत्रीत भिजत उभं होतं.भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं.तीने गाडी थांबवली आणि नीट पाहीलं तर ते त्याचेच आई-वडील निघाले.तीने गाडी थांबवून त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं तीला वाटत होतं पण लगेच मनातली सुडाची आग जागी झाली.त्यांनी आपली श्रींमती पाहावी..त्यांनी आपली गाडी पाहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकानं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं तीला मनोमन वाटतं होतं.त्याला धडा शिकवण्याच्या,अपमानाच्या घावांची परतफेड करण्याच्या एका वळणावर आपण आलो आहोत हे तीला जाणवलं.ते दोघे मात्र स्मशानभुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहिले तसं ही सुद्धा गाडीतुन उतरुन त्यांच्यामागे गेली व तिथं जे काही पाहिलं त्यामुळं पूर्ण कोसळली..त्याचाच फोटो..तसाच हसरा चेहरा..कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली व तिने नकारलेली कागदांची फुलंसुद्धा तशीच..ही सुन्न झाली व धावतच कबरीकडे गेली.त्याच्या आईबाबांना विचारलं "काय झालं ते सांगा.." ते म्हणाले,"तो परदेशी कधीच गेला नाही.त्याला डॉक्टर लोकांच्या चुकीच्या उपचारामुळे कर्करोग झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होते त्याच्या हातात..आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देऊन तो गेला..तू संतापुन उभी राहशील..यावर त्याचा विश्वास होता..म्हणुन त्यानं तुला सोडुन जाण्याचा नाटक केलं आणि तो दुसऱ्यासोबत पैसा व इतर गोष्टी भेटल्या म्हणून निघून गेल्याचं चित्र तुझ्यासमोर त्यानेच तर उभं केलं..आज त्याचं वर्षश्राद्ध.. म्हणून आम्ही इथं आलो".
©शब्दवेडा किशोर
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here