White भेद शब्दवेडा किशोर नर नारीत मांडला देह आकार | मराठी कविता

"White भेद शब्दवेडा किशोर नर नारीत मांडला देह आकार वेगवेगळा तोच चैतन्य उत्सव भिन्न रूपात नटला ||१|| तिला ठेवले चुलीला तो गेला रे शिकारीला पेशी एक एक असे नियमात बांधलेला ||२|| त्याची वाढली ताकत तो रे झाला आक्रमक तिचे वाढले कौशल्य तिला सृजनी कौतुक ||३|| मग झाले अवघड मूळ पदाला ते येणे तिच्या माथी ये गुलामी तया स्वामीत्व जन्माने ||४|| त्याला सापडेना मूळ तिला सापडेना कुळ शत सहस्त्र वर्षाचा मग चाले दुष्ट खेळ ||५|| रुप बंधन तिलाच योनी शुचिता वैभव तो रे मात्र उधळे चौखूर नाही त्यासी कसला धरबंद ठाव ||६|| ©शब्दवेडा किशोर"

 White भेद
शब्दवेडा किशोर 
नर नारीत मांडला देह आकार वेगवेगळा
तोच चैतन्य उत्सव भिन्न रूपात नटला ||१||
तिला ठेवले चुलीला तो गेला रे शिकारीला 
पेशी एक एक असे नियमात बांधलेला  ||२||
त्याची वाढली ताकत तो रे झाला आक्रमक 
तिचे वाढले कौशल्य तिला सृजनी कौतुक  ||३||
मग झाले अवघड मूळ पदाला ते येणे 
तिच्या माथी ये गुलामी तया स्वामीत्व जन्माने  ||४||
त्याला सापडेना मूळ तिला सापडेना कुळ 
शत सहस्त्र वर्षाचा मग चाले दुष्ट खेळ   ||५||
रुप बंधन तिलाच योनी शुचिता वैभव
तो रे मात्र उधळे चौखूर नाही त्यासी कसला धरबंद ठाव    ||६||

©शब्दवेडा किशोर

White भेद शब्दवेडा किशोर नर नारीत मांडला देह आकार वेगवेगळा तोच चैतन्य उत्सव भिन्न रूपात नटला ||१|| तिला ठेवले चुलीला तो गेला रे शिकारीला पेशी एक एक असे नियमात बांधलेला ||२|| त्याची वाढली ताकत तो रे झाला आक्रमक तिचे वाढले कौशल्य तिला सृजनी कौतुक ||३|| मग झाले अवघड मूळ पदाला ते येणे तिच्या माथी ये गुलामी तया स्वामीत्व जन्माने ||४|| त्याला सापडेना मूळ तिला सापडेना कुळ शत सहस्त्र वर्षाचा मग चाले दुष्ट खेळ ||५|| रुप बंधन तिलाच योनी शुचिता वैभव तो रे मात्र उधळे चौखूर नाही त्यासी कसला धरबंद ठाव ||६|| ©शब्दवेडा किशोर

#माझ्या_लेखणीतून

People who shared love close

More like this

Trending Topic