World Poetry Day 21 March कवितेची गझल साधी सोपी म | मराठी शायरी आणि गझ

"World Poetry Day 21 March कवितेची गझल साधी सोपी मना भावते छोटी कविता... जगण्यामरण्यावरती करते कोटी कविता! दिसते जे जे तया मांडते खरेपणाने... मालमसाला असेल, नसते खोटी कविता! उपमा काही अलंकारही आवडल्यावर, सजते धजते कुठे राहते थोटी कविता? प्रसंग घटना घडती काही सभोवताली.. न्याय तयाला देण्याची हातोटी कविता! अभंग गाणी गीत लावणी लेकुरवाळी, गझलेलाही पोसत आली पोटी कविता! जयराम धोंगडे (९४२२५५३३६९) ©Jairam Dhongade"

 World Poetry Day 21 March कवितेची गझल

साधी सोपी मना भावते छोटी कविता...
जगण्यामरण्यावरती करते कोटी कविता!

दिसते जे जे तया मांडते खरेपणाने...
मालमसाला असेल, नसते खोटी कविता!

उपमा काही अलंकारही आवडल्यावर,
सजते धजते कुठे राहते थोटी कविता?

प्रसंग घटना घडती काही सभोवताली..
न्याय तयाला देण्याची हातोटी कविता!

अभंग गाणी गीत लावणी लेकुरवाळी,
गझलेलाही पोसत आली पोटी कविता!

जयराम धोंगडे (९४२२५५३३६९)

©Jairam Dhongade

World Poetry Day 21 March कवितेची गझल साधी सोपी मना भावते छोटी कविता... जगण्यामरण्यावरती करते कोटी कविता! दिसते जे जे तया मांडते खरेपणाने... मालमसाला असेल, नसते खोटी कविता! उपमा काही अलंकारही आवडल्यावर, सजते धजते कुठे राहते थोटी कविता? प्रसंग घटना घडती काही सभोवताली.. न्याय तयाला देण्याची हातोटी कविता! अभंग गाणी गीत लावणी लेकुरवाळी, गझलेलाही पोसत आली पोटी कविता! जयराम धोंगडे (९४२२५५३३६९) ©Jairam Dhongade

#WorldPoetryDay

People who shared love close

More like this

Trending Topic