*विवेकानंद* भंगलेल्यांची मानव सेवा, गांजलेल्यांची | मराठी कविता

"*विवेकानंद* भंगलेल्यांची मानव सेवा, गांजलेल्यांची मानव सेवा, विवेकानंदाची ही ईश्वर सेवा, नरेंद्रांची शिव भावे जीव सेवा । विवेकानंद तेजस्वी ज्ञानाचा भंडार, संन्यास्याने गिळला भेदांचा अंधार, तरुण भारताच्या भविष्याचा आकार, जागृत भारताचा विवेकानंद आधार । विषारी जातीपातींच्या तोडूनी भिंत, मानवतेचा प्रसार करणारा साधु संत, धर्म आणि कर्तव्याला जोडलेला बंध, प्रेरणास्थान युवकांचा स्वामी विवेकानंद। भारत माता आपली देवता आहे, जगदगुरू भारताचा सम्मान आहे, संकटाशी लढणारा तरुण युवा आहे, राष्ट्रप्रेमाचा नंदादीप विवेकानंद आहे। निजलेली तरुणाई जागी झाली, हदयातील राष्ट्रभक्ती तेजाळली, चिरंतन राष्ट्रहित चेतना हि स्फुरली, विवेकानंदांच्या चिंतनाने देश बलशाली। राष्ट्र सेवा ध्येयासाठी दौडत दौडत जाऊ, कंटकांची तमा न आम्हा पाऊल पुढेच ठेवू, भालिच कुंकुमटिळा गीत राष्ट्राचे स्फूर्तीने गाऊ, विश्वगुरू राष्ट्र आमुचे पुन्हा जगाला दावू। *✍️@ अमोल तपासे, नागपूर* tapaseamol31@gmail.com* ©Amol Tapase"

 *विवेकानंद*
भंगलेल्यांची मानव सेवा,
गांजलेल्यांची मानव सेवा,
विवेकानंदाची ही ईश्वर सेवा,
नरेंद्रांची शिव भावे जीव सेवा ।

विवेकानंद तेजस्वी ज्ञानाचा भंडार,
संन्यास्याने गिळला भेदांचा अंधार,
तरुण भारताच्या भविष्याचा आकार,
जागृत भारताचा विवेकानंद आधार ।

विषारी जातीपातींच्या तोडूनी भिंत,
मानवतेचा प्रसार करणारा साधु संत,
धर्म आणि कर्तव्याला जोडलेला बंध,
प्रेरणास्थान युवकांचा स्वामी विवेकानंद।

भारत माता आपली देवता आहे,
जगदगुरू भारताचा सम्मान आहे,
संकटाशी लढणारा तरुण युवा आहे,
राष्ट्रप्रेमाचा नंदादीप विवेकानंद आहे।

निजलेली  तरुणाई जागी  झाली,
हदयातील राष्ट्रभक्ती तेजाळली,
चिरंतन राष्ट्रहित चेतना हि स्फुरली,
विवेकानंदांच्या चिंतनाने देश बलशाली।

राष्ट्र सेवा ध्येयासाठी दौडत दौडत जाऊ,
कंटकांची तमा न आम्हा पाऊल पुढेच ठेवू,
भालिच कुंकुमटिळा गीत राष्ट्राचे स्फूर्तीने गाऊ,
विश्वगुरू राष्ट्र आमुचे पुन्हा जगाला दावू।
*✍️@ अमोल तपासे, नागपूर*
tapaseamol31@gmail.com*

©Amol Tapase

*विवेकानंद* भंगलेल्यांची मानव सेवा, गांजलेल्यांची मानव सेवा, विवेकानंदाची ही ईश्वर सेवा, नरेंद्रांची शिव भावे जीव सेवा । विवेकानंद तेजस्वी ज्ञानाचा भंडार, संन्यास्याने गिळला भेदांचा अंधार, तरुण भारताच्या भविष्याचा आकार, जागृत भारताचा विवेकानंद आधार । विषारी जातीपातींच्या तोडूनी भिंत, मानवतेचा प्रसार करणारा साधु संत, धर्म आणि कर्तव्याला जोडलेला बंध, प्रेरणास्थान युवकांचा स्वामी विवेकानंद। भारत माता आपली देवता आहे, जगदगुरू भारताचा सम्मान आहे, संकटाशी लढणारा तरुण युवा आहे, राष्ट्रप्रेमाचा नंदादीप विवेकानंद आहे। निजलेली तरुणाई जागी झाली, हदयातील राष्ट्रभक्ती तेजाळली, चिरंतन राष्ट्रहित चेतना हि स्फुरली, विवेकानंदांच्या चिंतनाने देश बलशाली। राष्ट्र सेवा ध्येयासाठी दौडत दौडत जाऊ, कंटकांची तमा न आम्हा पाऊल पुढेच ठेवू, भालिच कुंकुमटिळा गीत राष्ट्राचे स्फूर्तीने गाऊ, विश्वगुरू राष्ट्र आमुचे पुन्हा जगाला दावू। *✍️@ अमोल तपासे, नागपूर* tapaseamol31@gmail.com* ©Amol Tapase

People who shared love close

More like this

Trending Topic