कधी पहिला का तुम्ही
एखादा सागरी किनारा
भासतो जणू कधी कधी
तुमच्या स्वप्नांचा सहारा
कधी बसलात का किनाऱ्यावर
वाळूत टाकून पाय
कदाचित नक्कीच भासेल
ती एक प्रेमळ माय
कधी जाऊन पहा
एकांतात समुद्रावरिल सूर्योदय
नक्कीच लावून जाईल तो
तुमच्या डोळ्यांना प्रेमाची सवय
कधी पाहिलात का
सागरी उसळणाऱ्या लाटा
सांगतात गैरसमजा नंतरही असू द्या
नेहमी तुमच्यात जवळीकता
कधी पाहिलात का
सागरावरील उडणाऱ्या पक्षाचा थवा
सांगून जाईल उंच उडण्या नेहमी
आपल्या लोकांचा हात हाथी हवा
कधी पाहिलात का तुम्ही
सागरावरील सायंकाळचा सूर्यास्त
लाल छटा करून सोडेल तुमच्या
नयनांना नक्कीच मदमस्त
एकदा जाऊन बघाच सागराचे
अथांग संथ पाणी
ते नक्कीच सांगेल तुम्हाला
सामावून घ्या सर्व तुमच्या मनी
म्हणून म्हणतो एकांतात नेहमी
जावं समुद्र किनारी
आणि अनुभवावी ही आनंदाची बडेजंग मेजवानी.....(2)
@प्रशांत
किनारा