Prashant Kadav

Prashant Kadav

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता #मीआणितू #RajaRaani  तुझ्या टपोऱ्या डोळयांनी 
वेड लावलय मला
तुला पाहताच क्षणी 
माझं हृदय दिला
य तुला.....🥰😘

©Prashant Kadav
#मराठीकविता #प्रवास  White कधी कधी असंच बिना थांबा
चालण्याची ही एक मजा असते
दिशेवीना मार्ग क्रमित करणे 
हे तर बहुतांश लोकांचं स्वप्न असते

स्वप्न पूर्ती असली होणे हे तर 
जणू स्वर्गस्थ सुखाची छाया असते
सुखाची आशा करताच तसल्या
भावनांची फांदी सुद्धा पल्लवित होते

पल्लवित होण्या असल्या फांद्या यांना
सुद्धा निसर्ग उघड बाहुणे साथ देते
बाहू पसारुन तुम्हाला ही तुमच्या स्वप्नवत 
अस्पष्ट प्रवासाचा मार्ग जणू दाखवून देते

मार्गही असा जसा कधी कुणी 
त्याची कल्पना ही केलेली नसते
कल्पना जरी नसली तरी काल्पनीकतेतुन 
सत्यता याची महती हळूच तुम्हा समोर येते.....(2)

©Prashant Kadav

स्त्री आदर झालाय सर्वत्र काळोख आता, भयभित सारे जिवन हे. आयुष्याची देणगी स्त्रीची, बळकावू पाहतायेत नराधम सारे. लढा अस्मितेसाठी त्यांचा, फार काळ आहे जुना. नको देऊ त्रास तिला, घेईल मदमर्दिनीचा अवतार पुन्हा. प्रकाशाच्या वाटा त्यांनी , सावित्रीमाईच्या कुशीत पाहिल्या. जिजाऊंकडून जिद्द आणि, कष्ट आईकडून शिकल्या. ठेऊन भान महापुरूषांचे, आदर स्त्रीचा कर जरा. पुन्हा ताठ मानेने जगण्यासाठी, प्रोत्साहित आता कर तिला.

#Womens_Day #freebird  स्त्री आदर

झालाय सर्वत्र काळोख आता,
भयभित सारे जिवन हे.
आयुष्याची देणगी स्त्रीची,
बळकावू पाहतायेत नराधम सारे.

लढा अस्मितेसाठी त्यांचा,
फार काळ आहे जुना.
नको देऊ त्रास तिला,
घेईल मदमर्दिनीचा अवतार पुन्हा.

प्रकाशाच्या वाटा त्यांनी ,
सावित्रीमाईच्या कुशीत पाहिल्या.
जिजाऊंकडून जिद्द आणि,
कष्ट आईकडून शिकल्या.

ठेऊन भान महापुरूषांचे,
आदर स्त्रीचा कर जरा.
पुन्हा ताठ मानेने जगण्यासाठी,
प्रोत्साहित आता कर तिला.
#inspirational

poem

39537 View

कधी पहिला का तुम्ही एखादा सागरी किनारा भासतो जणू कधी कधी तुमच्या स्वप्नांचा सहारा कधी बसलात का किनाऱ्यावर वाळूत टाकून पाय कदाचित नक्कीच भासेल ती एक प्रेमळ माय कधी जाऊन पहा एकांतात समुद्रावरिल सूर्योदय नक्कीच लावून जाईल तो तुमच्या डोळ्यांना प्रेमाची सवय कधी पाहिलात का सागरी उसळणाऱ्या लाटा सांगतात गैरसमजा नंतरही असू द्या नेहमी तुमच्यात जवळीकता कधी पाहिलात का सागरावरील उडणाऱ्या पक्षाचा थवा सांगून जाईल उंच उडण्या नेहमी आपल्या लोकांचा हात हाथी हवा कधी पाहिलात का तुम्ही सागरावरील सायंकाळचा सूर्यास्त लाल छटा करून सोडेल तुमच्या नयनांना नक्कीच मदमस्त एकदा जाऊन बघाच सागराचे अथांग संथ पाणी ते नक्कीच सांगेल तुम्हाला सामावून घ्या सर्व तुमच्या मनी म्हणून म्हणतो एकांतात नेहमी जावं समुद्र किनारी आणि अनुभवावी ही आनंदाची बडेजंग मेजवानी.....(2) @प्रशांत

 कधी पहिला का तुम्ही 
एखादा सागरी किनारा
भासतो जणू कधी कधी 
तुमच्या स्वप्नांचा सहारा

कधी बसलात का किनाऱ्यावर 
वाळूत टाकून पाय
कदाचित नक्कीच भासेल 
ती एक  प्रेमळ माय

कधी जाऊन पहा 
एकांतात समुद्रावरिल सूर्योदय
नक्कीच लावून जाईल तो 
तुमच्या डोळ्यांना प्रेमाची सवय

कधी पाहिलात का 
सागरी उसळणाऱ्या लाटा
सांगतात गैरसमजा नंतरही असू द्या
नेहमी तुमच्यात जवळीकता

कधी पाहिलात का 
सागरावरील उडणाऱ्या पक्षाचा थवा
सांगून जाईल उंच उडण्या नेहमी
आपल्या लोकांचा हात हाथी हवा

कधी पाहिलात का तुम्ही
सागरावरील सायंकाळचा सूर्यास्त
लाल छटा करून सोडेल तुमच्या
नयनांना नक्कीच मदमस्त

एकदा जाऊन बघाच सागराचे 
अथांग संथ पाणी
ते नक्कीच सांगेल तुम्हाला 
सामावून घ्या सर्व तुमच्या मनी

म्हणून म्हणतो एकांतात नेहमी 
जावं समुद्र किनारी
आणि अनुभवावी ही आनंदाची बडेजंग मेजवानी.....(2)
             
                                                                           @प्रशांत

किनारा

6 Love

Trending Topic