आराधना
धावणाऱ्या हे मना तू थांबना...
का असा तू धावतो मज सांगना?
वेदना झाल्या मुक्या आनंदलो...
सार्थकी बघ लागताहे साधना!
पाझरावे काळजाने पाहता..
दैन्य सारे दुःख अन् त्या यातना!
जीव आहे जोवरी देहात या...
नित्यनेमाने करो आराधना!
होत राहो चांगले मज वाटते...
पोटतिडकीची अशी शुभकामना!
जयराम धोंगडे, नांदेड
©Jairam Dhongade
#prayer