कसे आवरू मनाला
करे कल्पना विलास
सैरभैर पळतांना
स्वप्न पाही मदहोश
आवरता येतील ही
गुंफलेल्या भावनांना
पण कसे आवरू मी
गुंतलेल्या वेड्या मना...
मन अवखळ वारा
कसे त्यांस थोपवावे
सारा सोडूनी पसारा
मनसोक्त विहरावे..
आला वसंता बहर
मनी आठव फुलांचा
दरवळे सुगंध हा
तुझ्या नि माझ्या श्वासाचा
धुंद बेभान झालयं
शोधतो मिलनाच्या खुणा
रात्र सजता सुगंधी
साद घालतो माझा रमणा
©®हर्षा पाटील
हर्ष धारा