Harsha Patil

Harsha Patil

Education Officer

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता #guru_purnima  White      गुरू 
आई सर्व प्रथमेची 
गुरू मायेचा सागरू ..
मज हवे ते देणारा
निरामय कल्पतरू..१
सागराची अथांगता
सामावली असे ज्यात...
अगणित मोतीयांचे
कुंभ  भरुनी वाहत...२
असे समृद्ध शिक्षक
लावी लळा अक्षरांचा..
सान- थोर,आप्तजन 
पाठ देती जीवनाचा .३
गुरू सद्गुणांची खाण
असे मायेची माऊली..
देई संस्कार शिदोरी
स्मरे पावलोपावली...४
गुरू असती परीस
लोखंडाचे सोने करी...
दावी प्रकाशाचा मार्ग
स्वप्न आपुले साकारी...५

©Harsha Patil

#guru_purnima गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹

90 View

#मराठीकविता #Walk  
         गारवा
अवेळी  आलेल्या पावसाने
अवनी  अंगोपांगी शहारली....
हिम गाराच्या गारव्याने
धुक्याची शाल पांघरली....

©Harsha Patil

#Walk

108 View

#मराठीकविता #makarsankranti  शीर्षक : संक्रात
आदित्याचा मकरराशीत 
या दिनी होताचं प्रवेश
दक्षिणायन संपुष्टात
उत्तरायण धारण वेश.....१
सुहासिनीं नटण्याचा
असे साजिरा गोड सण
ऊस- बोरे , तिळगुळ
सुगडीचा देती वाण.....२
काळी चंद्रकळा लेवूनी
नववधू सुंदर सजते
हळदी कुंकू लुटूनी 
संक्रात मनोभावे पुजते......३
तिळ असे जरी कणभर
सामावून घेण्यास समर्थ
मानवा सोड मोह, वाट प्रेम
जीवनास लाभेल मग अर्थ.....४
नववर्षाच्या या सणाने
तिळ तिळ वाढे जसे दिस
सुख समाधानात जाऊदे
वर्ष हे दोन हजार चोवीस ....५

©Harsha Patil
#मराठीकविता  शीर्षक: सावित्रीच्या लेकी 
स्वातंत्र्याची जाण देणाऱ्या 
होत्या सावित्रीबाई फुले
क्रांती झाली स्त्रियांमध्ये
घडला इतिहास यामुळे...
जातीधर्म भेद सारुनी
 बालिकागृह केले सुरू 
पहिल्या मुलींच्या शाळेने 
ज्ञानाचा रचला महामेरू....
चुलमूल बेगडीचे स्त्रीवरी 
समाजाने ठोकले टाळे 
प्रगतीचं दीप उजळोनी
दूर झाले अंधारजाळे......
समाजसेवा हाच होता 
क्रांतीसूर्य,ज्योतीचा ध्यास
प्लेग रुग्णाच्या सेवेतच
साऊ सोडी अखेरचा श्वास
सावित्रीच्या आम्ही लेकी
ध्येयाने घेतो उंच भरारी 
कर्तृत्व मोहर उमटवूनी 
जगावर होतोय भारी.
*हर्षा हिरा पाटील*
* *वि.अधिकारी शिक्षण पालघर.*

©Harsha Patil

शीर्षक: सावित्रीच्या लेकी स्वातंत्र्याची जाण देणाऱ्या होत्या सावित्रीबाई फुले क्रांती झाली स्त्रियांमध्ये घडला इतिहास यामुळे... जातीधर्म भेद सारुनी बालिकागृह केले सुरू पहिल्या मुलींच्या शाळेने ज्ञानाचा रचला महामेरू.... चुलमूल बेगडीचे स्त्रीवरी समाजाने ठोकले टाळे प्रगतीचं दीप उजळोनी दूर झाले अंधारजाळे...... समाजसेवा हाच होता क्रांतीसूर्य,ज्योतीचा ध्यास प्लेग रुग्णाच्या सेवेतच साऊ सोडी अखेरचा श्वास सावित्रीच्या आम्ही लेकी ध्येयाने घेतो उंच भरारी कर्तृत्व मोहर उमटवूनी जगावर होतोय भारी. *हर्षा हिरा पाटील* * *वि.अधिकारी शिक्षण पालघर.* ©Harsha Patil

36 View

#मराठीकविता  शीर्षक:युगंधर
आदी- कृष्ण जन्मदिन
योगमायेचे बलिदान
त्यागसंपन्न गोविंद
युगंधर जीवदान.....
श्रावण मध्य अष्टमीला
मथुरेत बाळ जन्मला
रेखलेले पाहुनी ललाटी
चंद्रमा नभी हासला....
देवकी -वसुदेव पुत्र
गोपिकांचा झाला कान्हा
राधेचा प्रेमळ सखा
यशोदा मैय्याचा तांन्हा.....
निळ्याशार नभांगणी
कान्हा वाजवी बासरी
पशुपक्षी मंत्रमुग्ध
राधा होई गं बावरी.....
रूपे नि नामे अनेक
धारण करी गिरीधारी
दैत्यांचा कर्दनकाळ
सावळे रूप मनोहार

©Harsha Patil

जन्मष्टीमीच्या सर्वांना

48 View

#मराठीकविता  कसे आवरू मनाला
करे कल्पना विलास
सैरभैर पळतांना
स्वप्न पाही मदहोश
आवरता  येतील ही
गुंफलेल्या भावनांना
पण कसे आवरू मी
गुंतलेल्या वेड्या मना...
मन अवखळ  वारा
कसे त्यांस थोपवावे
सारा सोडूनी पसारा
मनसोक्त विहरावे..
आला  वसंता  बहर
मनी आठव  फुलांचा
दरवळे सुगंध हा
तुझ्या नि माझ्या श्वासाचा
धुंद  बेभान  झालयं
शोधतो  मिलनाच्या खुणा
रात्र सजता सुगंधी
साद घालतो  माझा  रमणा
©®हर्षा  पाटील

हर्ष धारा

88 View

Trending Topic