सौरम्य स्नेह मंजिरी , मंदाकिनी शर्मिष्ठा तू
गुलाबी, निळा, जांभळा रंग, शुभ्र बिलोरी चांदणे तू
दवात भिजल्या गवताला छेडणारी तू अधिर कोवळे ऊन
तूच चैत्रपल्लवी सृजनभोर,तूच फुलपंखी चित्रविहार
तूच अबोली तूच पारिजात तूच सोनचाफा छान
दवात भिजल्या गवताला छेडणारी तू अधिर कोवळे ऊन
तुझे चालणे, तुझे हसणे सळसळणारी ती पाने
कुरळे कुंतल काजळभोर,हंस ध्वनी पैंजण छेडी गोड कोकिळेचे गाणे
दवात भिजल्या गवताला छेडणारी तू अधिर कोवळे ऊन
© प्रियांका भगत
#poem #MarathiKavita#Prem