विवेक प्रत्येकाचा विचार आता एक पाहिजे कराल जे जे | मराठी शायरी आणि गझल

"विवेक प्रत्येकाचा विचार आता एक पाहिजे कराल जे जे ते ते सारे नेक पाहिजे! रुसवे फुगवे लाडीगोडी खताप्रमाणे फुलण्या संसारवेल बहुतेक पाहिजे! नातीगोती जणू गझल ती आयुष्याची नजाकतीने संवादाची फेक पाहिजे! दोन घराला आणि कुळाला जोडत जाते पाठीपोटी प्रत्येकाच्या लेक पाहिजे! दुसऱ्याचेही दुःख जाणणे कलाच मोठी त्यासाठी तर हृदयात विवेक पाहिजे! जयराम धोंगडे, नांदेड 9422553369 ©Jairam Dhongade"

 विवेक

प्रत्येकाचा विचार आता एक पाहिजे
कराल जे जे ते ते सारे नेक पाहिजे!

रुसवे फुगवे लाडीगोडी खताप्रमाणे
फुलण्या संसारवेल बहुतेक पाहिजे!

नातीगोती जणू गझल ती आयुष्याची
नजाकतीने संवादाची फेक पाहिजे!

दोन घराला आणि कुळाला जोडत जाते
पाठीपोटी प्रत्येकाच्या लेक पाहिजे!

दुसऱ्याचेही दुःख जाणणे कलाच मोठी
त्यासाठी तर हृदयात विवेक पाहिजे!

जयराम धोंगडे, नांदेड
9422553369

©Jairam Dhongade

विवेक प्रत्येकाचा विचार आता एक पाहिजे कराल जे जे ते ते सारे नेक पाहिजे! रुसवे फुगवे लाडीगोडी खताप्रमाणे फुलण्या संसारवेल बहुतेक पाहिजे! नातीगोती जणू गझल ती आयुष्याची नजाकतीने संवादाची फेक पाहिजे! दोन घराला आणि कुळाला जोडत जाते पाठीपोटी प्रत्येकाच्या लेक पाहिजे! दुसऱ्याचेही दुःख जाणणे कलाच मोठी त्यासाठी तर हृदयात विवेक पाहिजे! जयराम धोंगडे, नांदेड 9422553369 ©Jairam Dhongade

#teddyday

People who shared love close

More like this

Trending Topic