जयराम धोंगडे

जयराम धोंगडे

साहित्यिक-कवी-गझलकार-कादंबरीकार

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

voters day quotes in hindi एका मतानेही फार फरक पडतो भाऊ... आपल्यासाठी आपण मतदानाला जाऊ! मतदान आपला हक्क आणि कर्तव्यही... जनहितार्थ! ©Jairam Dhongade

#मराठीविचार  voters day quotes in hindi एका मतानेही फार फरक पडतो भाऊ...
आपल्यासाठी आपण मतदानाला जाऊ!


मतदान आपला हक्क आणि कर्तव्यही...

जनहितार्थ!

©Jairam Dhongade

voters day quotes in hindi एका मतानेही फार फरक पडतो भाऊ... आपल्यासाठी आपण मतदानाला जाऊ! मतदान आपला हक्क आणि कर्तव्यही... जनहितार्थ! ©Jairam Dhongade

11 Love

White मतदान मतदानाच्या अधिकाराला चुकणे नाही... पसंतीतल्या उमेदवारा मुकणे नाही! काम असो की असो तातडी कितीक मोठी... बजावण्याला हक्क एवढा रुकणे नाही! धाकदडपशा पैसा अडका झुगारू चला... लक्ष्मीसाठी सरस्वतीने झुकणे नाही! आपल्यातली भली माणसे निवडू आपण... आलेली ही संधी नामी हुकणे नाही! हवा यायला तो होता पण हा का आला? उगाच नंतर यावर त्यावर भुकणे नाही! जयराम धोंगडे (९४२२५५३३६९) ----------------------------------------------------- मतदान आपला हक्क आणि कर्तव्य आहे, ते आपण बजावलेच पाहिजे! जनहितार्थ... ©Jairam Dhongade

#मराठीशायरी #VoteForIndia  White मतदान

मतदानाच्या अधिकाराला चुकणे नाही...
पसंतीतल्या उमेदवारा मुकणे नाही!

काम असो की असो तातडी कितीक मोठी...
बजावण्याला हक्क एवढा रुकणे नाही!

धाकदडपशा पैसा अडका झुगारू चला...
लक्ष्मीसाठी सरस्वतीने झुकणे नाही!

आपल्यातली भली माणसे निवडू आपण...
आलेली ही संधी नामी हुकणे नाही!

हवा यायला तो होता पण हा का आला?
उगाच नंतर यावर त्यावर भुकणे नाही!

जयराम धोंगडे (९४२२५५३३६९)
-----------------------------------------------------
मतदान आपला हक्क आणि कर्तव्य आहे, 
ते आपण बजावलेच पाहिजे!

जनहितार्थ...

©Jairam Dhongade

#VoteForIndia

15 Love

माहोल  नयनात घोर चिंता हृदयात आस नाही, आली जरी दिवाळी, माहोल खास नाही!  ------------------------------------------ दिसतात बघ फुले ती चित्तास वेधणारी, नकलीच शेवटी ती, कसलाच वास नाही!  ------------------------------------------ आहे प्रवाह जैसा पोहून पार हो ना, साधेपणात येथे, होणार त्रास नाही!  ------------------------------------------ खातात साखरेचे खावोत ते भलेही, द्यावे भुक्यास थोडे, कोणास ध्यास नाही! ------------------------------------------ दिनरात राबल्यावर हातात पीक आले, मालास भाव नाही, पोटात घास नाही!  ----------------------------------------- चालू असेच आहे चालेल या पुढेही, उजळेल भाग्य ऐसा, येणार मास नाही!  ----------------------------------------- लिहतोय आज सारे पाहून मी हताशा, येतील दिन सुखाचे, जर तू उदास नाही!  ------------------------------------------- जयराम धोंगडे, नांदेड *** ©Jairam Dhongade

#मराठीशायरी #Diwali  माहोल 

नयनात घोर चिंता हृदयात आस नाही,
आली जरी दिवाळी, माहोल खास नाही! 
------------------------------------------
दिसतात बघ फुले ती चित्तास वेधणारी,
नकलीच शेवटी ती, कसलाच वास नाही! 
------------------------------------------
आहे प्रवाह जैसा पोहून पार हो ना,
साधेपणात येथे, होणार त्रास नाही! 
------------------------------------------
खातात साखरेचे खावोत ते भलेही,
द्यावे भुक्यास थोडे, कोणास ध्यास नाही!
------------------------------------------
दिनरात राबल्यावर हातात पीक आले,
मालास भाव नाही, पोटात घास नाही! 
-----------------------------------------
चालू असेच आहे चालेल या पुढेही,
उजळेल भाग्य ऐसा, येणार मास नाही! 
-----------------------------------------
लिहतोय आज सारे पाहून मी हताशा,
येतील दिन सुखाचे, जर तू उदास नाही! 
-------------------------------------------
जयराम धोंगडे, नांदेड
***

©Jairam Dhongade

#Diwali

13 Love

दिवाळी अंधारावर पणतीची मात दिवाळी... आनंदाचा वाहता प्रपात दिवाळी! मरगळलेल्या मना उभारी देण्याला... चैतन्याची नवखी सुरुवात दिवाळी! थाटमाट वर्णावा या काय सणाचा... आतषबाजीचा झंझावात दिवाळी! तो राजा अन् ती राणी या संसारी... नवलाईची पुन्हा दोघांत दिवाळी! सण हा मोठा पाच दिसाचा मुक्कामी... त्याचमुळे आवडती लोकांत दिवाळी! जयराम धोंगडे (९४२२५५३३६९) ©Jairam Dhongade

#मराठीशायरी #Diwali  दिवाळी

अंधारावर पणतीची मात दिवाळी...
आनंदाचा वाहता प्रपात दिवाळी!

मरगळलेल्या मना उभारी देण्याला...
चैतन्याची नवखी सुरुवात दिवाळी!

थाटमाट वर्णावा या काय सणाचा...
आतषबाजीचा झंझावात दिवाळी!

तो राजा अन् ती राणी या संसारी...
नवलाईची पुन्हा दोघांत दिवाळी!

सण हा मोठा पाच दिसाचा मुक्कामी...
त्याचमुळे आवडती लोकांत दिवाळी!

जयराम धोंगडे (९४२२५५३३६९)

©Jairam Dhongade

#Diwali

12 Love

दुःखा दुःखा तुला मी नेहमी कुरवाळले... अन् तू मलाही केवढे चोंभाळले! तू यार झाल्यावर कशाची वानवा? गद्दार झालेल्या सुखांना टाळले! मी ताठ मानेने उभा आहे गड्या... आयुष्य माझे वाटते गंधाळले! वाटा तशा त्या नागमोडी घातकी... पण चालताना तू मला सांभाळले! सोडून जातो वाटले थकताच मी... तू घट्ट जयरामास या कवटाळले! जयराम धोंगडे (9422553369) ©Jairam Dhongade

#मराठीशायरी #walkalone  दुःखा

दुःखा तुला मी नेहमी कुरवाळले...
अन् तू मलाही केवढे चोंभाळले!

तू यार झाल्यावर कशाची वानवा?
गद्दार झालेल्या सुखांना टाळले!

मी ताठ मानेने उभा आहे गड्या...
आयुष्य माझे वाटते गंधाळले!

वाटा तशा त्या नागमोडी घातकी...
पण चालताना तू मला सांभाळले!

सोडून जातो वाटले थकताच मी...
तू घट्ट जयरामास या कवटाळले!

जयराम धोंगडे (9422553369)

©Jairam Dhongade

#walkalone

11 Love

White विचारधारा मोडीत काढले मी सारे विचार कोते... जे ठेवले कधीचे माझ्या उरात होते! तोंडावरी स्तुती अन् वळताच पाठ दुषणे... चांडाळ चौकडीला कंटाळतेच जोते! सांगू तरी कुणाला ऐकू तरी कुणाचे... भोळा नि भाबडा मी सारे चतूर श्रोते! साधेपणात गोडी गोडीत सौख्य सारे... पाठीवरी वहावे का ते फुगीर पोते! सत्कर्म साधनेवर ठेवून ठाम श्रद्धा... दृढभाव हाच आहे गण गण गणात बोते! जयराम धोंगडे ©Jairam Dhongade

#मराठीशायरी #Dosti  White विचारधारा

मोडीत काढले मी सारे विचार कोते...
जे ठेवले कधीचे माझ्या उरात होते!

तोंडावरी स्तुती अन् वळताच पाठ दुषणे...
चांडाळ चौकडीला कंटाळतेच जोते!

सांगू तरी कुणाला ऐकू तरी कुणाचे...
भोळा नि भाबडा मी सारे चतूर श्रोते!

साधेपणात गोडी गोडीत सौख्य सारे...
पाठीवरी वहावे का ते फुगीर पोते!

सत्कर्म साधनेवर ठेवून ठाम श्रद्धा...
दृढभाव हाच आहे गण गण गणात बोते!

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade

#Dosti

16 Love

Trending Topic