एकांत
जशा दुरावती वाटा मना वाटे एक खंत,
विसरुनी पुन्हा सारे मन होई शांत.
आनंदाला नाही सीमा,दुःख येती अनंत,
स्वतःलाच जोडू स्वताशी हवा मग एकांत.
मनामनांत फिरत असते विचारांचे चक्र,
कधी जाते भरकटून तर कधी एकाग्र.
विचारांच्या दुनियेचा नाही हो अंत,
मन शांत करण्यासाठी हवा मग एकांत.
जीवनाच्या या समुद्रात पाण्याएवढ्या इच्छा,
रोज या मनाच्या नवनवीन अपेक्षा.
कधी खवले हा जीवनसमुद्र,तर कधी संथ.
किनाऱ्यावर येण्यासाठी हवा मग एकांत.
सतत चिंता-सतत काळजी रोज नवं वेगळं,
एकाच चक्रात फिरत आहे बघा जग सगळं.
सोडा चिंता धनाची,जीवन होईल उत्क्रांत.
हर्षित या जीवनासाठी हवा मग एकांत.
पाहावे आकाशी-बोलावे सागराशी बसुनिया निवांत,
प्रश्न सुटती-उत्तर मिळती हवा मग एकांत,
हवा मग एकांत......
-हर्षल दत्तात्रय चौधरी
©Harsh
#alone
#Soldier
#EKANT
#Life
#jivan