रघुवर वनवासी का असे सांग गेले
कपट तव कळाले पुत्र मातेस बोले
*"तनय भरत माझा सर्व त्याला मिळावे*
*वचन मज दिले जे आज मागून घ्यावे"*
सुचत तुज कसे हे कृत्य का नीच केले
मम दशरथ ताता तूच ना मारियेले
मज न कळत आता पाप फेडू कसे मी
मलिन वदन माझे सांग दावू कसे मी
भरत मग निघाला चालला तो वनासी
गुरुवर जन संगे आणण्या राघवासी
विनवुनि कर सांगे त्यास मागे फिरावे
परतुन नगरीचे राज्य तुम्ही करावे
रघुवर प्रिय भ्राता मोह नाही कशाचा
भरत अमर झाला बंधु हा राघवाचा
सतत स्मरण ठेवू हाच आदर्श घेऊ
भरत रघुवरांचे थोर पाईक होऊ
©जितू
बंधुप्रेम