जितू

जितू

  • Latest
  • Popular
  • Video

घेईन रजा गावाला जाण्यासाठी परतून जुन्या त्या क्षणांत रमण्यासाठी मी गावाला जाईन खूप काळाने भेटेन वृद्ध आजीस तिथे प्रेमाने काढेल दृष्ट ती थरथरत्या हाताने घेईल जवळ ती मला खूप प्रेमाने वाढेल करून मग गरम भाकरी भाजी देईल छानशी फळे खायला ताजी फिरण्यास जरा जाईन नदीच्या काठी धावेन पुन्हा मी गुरावासरां पाठी पाहीन रांग ती पक्ष्यांची उडताना ते सूर्यबिंब मावळतीला झुकताना स्मरतील खुणा मग बालपणीच्या न्याऱ्या करतील मनाला आनंदित त्या साऱ्या जाईल मनाची निघून मरगळ सारी लाभेल मनाला माझ्या नवी उभारी ©जितू

#SunSet  घेईन रजा गावाला जाण्यासाठी
परतून जुन्या त्या क्षणांत रमण्यासाठी
मी गावाला जाईन खूप काळाने
भेटेन वृद्ध आजीस तिथे प्रेमाने

काढेल दृष्ट ती थरथरत्या हाताने 
घेईल जवळ ती मला खूप प्रेमाने  
वाढेल करून मग गरम भाकरी भाजी 
देईल छानशी फळे खायला ताजी

फिरण्यास जरा जाईन नदीच्या काठी 
धावेन पुन्हा मी गुरावासरां पाठी
पाहीन रांग ती पक्ष्यांची उडताना 
ते सूर्यबिंब मावळतीला झुकताना

स्मरतील खुणा मग बालपणीच्या न्याऱ्या 
करतील मनाला आनंदित त्या साऱ्या  
जाईल मनाची निघून मरगळ सारी
लाभेल मनाला माझ्या नवी उभारी

©जितू

#SunSet

16 Love

#sad_shayari  White माणूस एवढा क्रूर कशाने होतो
आपल्या कृतीने पशूसही लाजवतो 
संताप द्वेष वासना अनावर होते 
वासनेपुढे मग भान कशाचे नसते 

कळतात बातम्या रोज नव्या घटनेच्या 
तोडतात साऱ्या सीमा माणुसकीच्या 
सैतानी वृत्ती जणू मनी संचरते 
स्त्री मोठी अथवा बळी चिमुरडी पडते 

अधमांना ऐशा कठोर शिक्षा द्यावी
जाणीव चुकीची क्षणाक्षणाला  व्हावी
स्त्री म्हणजे केवळ शरीर ऐसे नाही 
स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू नाही 

थांबवा प्रदर्शन सतत तिच्या देहाचे 
शोधावे मिळुनी समाधान प्रश्नाचे
सर्व स्तरांवर याविषयी चर्चा व्हावी 
थांबवण्या घटना ठोस योजना व्हावी

©जितू

#sad_shayari

90 View

#happy_independence_day  White ही भारतभूमी असे आपली माता
मन हर्षित होते गीत तिचे हो गाता
हे भाग्य आपले जन्म मिळाला येथे
नांदले देव अवतार घेउनी जेथे

अवतरले होते येथे राघव सीता
पार्थास सांगती येथे माधव गीता
जाहले इथे जे संत महात्मे ज्ञानी
जगतास चांगला मार्ग दाविला त्यांनी

वाहतात येथे गोदा गंगा यमुना
धावतात साऱ्या सुपीक भूमी करण्या
तीरावर त्यांच्या पीक डोलते छान
देतात नद्यांना आईचा हो मान

बोलतात सारे जरी वेगळ्या भाषा
नांदते तरीही मनात एकच आशा
असतात जरीही भिन्न भिन्न ते वेष
जाणतो तरीही एक आमचा देश

©जितू
#election_2024  श्रीवल्लभा दत्तराया समर्था मनापासुनी मी तुला वंदितो
सेवा घडावी तुझ्या पावलांची असा भाव भोळा मनी दाटतो
डोळ्यांपुढे साजिरी ती दिसावी मला दत्त मूर्ती सदा सर्वदा 
मूर्ती तुझी दिव्य पाहून माझ्या मना शांतता खूप लाभो सदा

किर्ती जिच्या थोर पातिव्रत्याची त्रिखंडात साऱ्या असे गाजली 
आले त्रिमूर्ती यतीवेषधारी परीक्षा तपाची तिच्या पाहिली
केले तपाच्या बळे बाळ त्यांना यथायोग्य भिक्षा तिने घातली 
एकत्र होऊन शक्ती तिघांची तुझ्या दिव्य रूपात साकारली 

पायी खडावा जटाभार माथी शिरे तीन बाहू सहा शोभती 
कांती तुझी दिव्य वात्सल्य मूर्ती तुझी पाहता भक्त आनंदती 
संकेतमात्रे तुझ्या विश्व चाले त्रिखंडात सत्ता तुझी चालते
सांभाळिशी तू तुझ्या साधकांना जशी लेकरा माय सांभाळते

लागो मनाला तुझा ध्यास ऐसा तुझे नाम घ्यावे सदा सर्वदा
राहो तुझा हात डोईवरी या घडो चांगले वा असो आपदा
लागो न वारा अहंकार रूपी तुझ्या नाममात्रे कधीही मना 
राहो मनी नेहमी प्रेम भक्ती तुला दत्तराया असे प्रार्थना

©जितू

#election_2024

135 View

 एकदा करीन | पंढरीची वारी 
राम कृष्ण हरी || मुखी माझ्या 

विटेवरी उभा | भक्तांचा कैवारी 
कर कटेवरी  || ठेवोनिया 

मृदुंगाची गोडी | अंतरी लागते 
रिंगणी नाचते || विणा  माझी 

विठू माझा बाप | माय रखुमाई 
डोळ्यातून वाही || चंद्रभागा 

पायरीत मिळे | मनाला विसावा 
घडो तुझी सेवा || पांडुरंगा 

रात्र अन् दिस | भक्ती तुझी केली 
चरणी ठेवली || काया माझी 


✍🏻 सौ. संध्या भूपेंद्र पोटफोडे

©जितू

एकदा करीन | पंढरीची वारी राम कृष्ण हरी || मुखी माझ्या विटेवरी उभा | भक्तांचा कैवारी कर कटेवरी || ठेवोनिया मृदुंगाची गोडी | अंतरी लागते रिंगणी नाचते || विणा माझी विठू माझा बाप | माय रखुमाई डोळ्यातून वाही || चंद्रभागा पायरीत मिळे | मनाला विसावा घडो तुझी सेवा || पांडुरंगा रात्र अन् दिस | भक्ती तुझी केली चरणी ठेवली || काया माझी ✍🏻 सौ. संध्या भूपेंद्र पोटफोडे ©जितू

90 View

 स्थिती वाईट झालेली असे हो आज किल्ल्यांची 
जिथे आहेत पडली पाउले प्रत्यक्ष शिवबांची
चिरा प्रत्येक इथला ओरडूनी सांगतो आहे 
जरा देऊन ऐका कान जे तो बोलतो आहे

नका येऊ कुणी फिरण्यास केवळ मौज करण्याला 
असे इतिहास जो घडला इथे जाणून घ्या त्याला 
नका भांडू तुम्ही जातीवरूनी एकमेकांशी 
खरे शिवभक्त जे ना शोभते हे वागणे त्यांसी

किती हा टाकता कचरा तुम्ही किल्ल्यांवरी येथे
पहा हे ढीग प्लास्टिकचे किती जमतात हो येथे
पिती दारू इथे येऊन ही नतद्रष्ट ते काही 
कशी ना वाटले त्यांच्या मनाला लाज थोडीही

नका वागू असे रे घाण ही टाकू नका येथे
असे त्या मावळ्यांनी रक्त त्यांचे सांडले जेथे 
अरे राखा तुम्ही पावित्र्य या गडकोट किल्ल्यांचे 
जरा समजून घ्या हे दुर्ग होते प्राण राज्याचे

खुणा दिसतील येथे वैभवाच्या थोर त्यागाच्या 
कथा सांगेल माती नीट ऐका वीर योद्ध्यांच्या
कथा ऐका तुम्ही समजून घ्या इतिहास हा त्यांचा 
असे एकत्र या ठेवा तुम्ही आदर्श राजांचा

©जितू

स्थिती वाईट झालेली असे हो आज किल्ल्यांची जिथे आहेत पडली पाउले प्रत्यक्ष शिवबांची चिरा प्रत्येक इथला ओरडूनी सांगतो आहे जरा देऊन ऐका कान जे तो बोलतो आहे नका येऊ कुणी फिरण्यास केवळ मौज करण्याला असे इतिहास जो घडला इथे जाणून घ्या त्याला नका भांडू तुम्ही जातीवरूनी एकमेकांशी खरे शिवभक्त जे ना शोभते हे वागणे त्यांसी किती हा टाकता कचरा तुम्ही किल्ल्यांवरी येथे पहा हे ढीग प्लास्टिकचे किती जमतात हो येथे पिती दारू इथे येऊन ही नतद्रष्ट ते काही कशी ना वाटले त्यांच्या मनाला लाज थोडीही नका वागू असे रे घाण ही टाकू नका येथे असे त्या मावळ्यांनी रक्त त्यांचे सांडले जेथे अरे राखा तुम्ही पावित्र्य या गडकोट किल्ल्यांचे जरा समजून घ्या हे दुर्ग होते प्राण राज्याचे खुणा दिसतील येथे वैभवाच्या थोर त्यागाच्या कथा सांगेल माती नीट ऐका वीर योद्ध्यांच्या कथा ऐका तुम्ही समजून घ्या इतिहास हा त्यांचा असे एकत्र या ठेवा तुम्ही आदर्श राजांचा ©जितू

144 View

Trending Topic