White एकाएकी ना मी केले रूप आजचे धारण
माझ्यामधला काढलाय मी बिनकामाचा कण कण
जश्या जश्या मी वाढवल्या माझ्या दृष्टीच्या कक्षा
प्रसरण पावत गेले माझ्या भोवतालचे रिंगण
जीव जन्मभर मोहाची आसक्ती शमवत गेला
दुःखे जन्मत गेली इच्छा होत राहिल्या गाभण
छोट्या छोट्या सुखांमधे मी मशगुल आहे सध्या
पाहू कुठले सुख ठरते माझ्या मुक्तीचे कारण
कोण कुणाला जसेच्या तसे अंगिकारतो नाथा
कुणास नाही येत आडवे, ज्याचे त्याचे मीपण
.
.
(वेगवेगळे बैल जुंपले दुनियेने गाड्यांना
पण सगळ्या चाकांमध्ये एकच वापरले वंगण)
एकनाथ
©Eknath Dhanke
#GoodNight