English
White ठरवून मीपणाचा केला जरी सफाया त्याच्याच फार नंतर मी मारल्या बढाया मिटणार ना कदाचित अंधार पण तसेही उघडून दार खिडक्या जाईल काय वाया प्रत्येक झाड जिथले निष्पर्ण काळजाचे त्या जंगलात सध्या मन शोधतेय छाया पडदा हटून होतो इतकाच फायदा की नव्हते दिसत अगोदर ते लागते दिसाया अंतीम वार बेतू शकतो तुझ्या जिवावर राखून ठेव काही प्यादी पुढे धराया एकनाथ ©Eknath Dhanke
Eknath Dhanke
10 Love
White बाजूस काठ दोन्ही अन् आत भोवरा ठरवू कसे? जिवाचा वळवू कुठे झरा वरवर स्वरूप माझे जे पाहिलेस तू तो मी नव्हे, न माझा तो चेहरा खरा त्याची दरार होऊ शकते पुढे कधी जो वाटतोय सध्या साधासुधा चरा सगळी भडास निघते कविते तुझ्यामुळे तू सोबतीण माझी अन् तूच मोहरा संकल्प तोडण्याची आलीच वेळ तर शोधून ठेव नाथा तू एक आसरा एकनाथ ©Eknath Dhanke
14 Love
White कीव अहंकाराची आली माझ्या कळाले मला जेव्हा काळाचे वय एकनाथ ©Eknath Dhanke
11 Love
White एकाएकी ना मी केले रूप आजचे धारण माझ्यामधला काढलाय मी बिनकामाचा कण कण जश्या जश्या मी वाढवल्या माझ्या दृष्टीच्या कक्षा प्रसरण पावत गेले माझ्या भोवतालचे रिंगण जीव जन्मभर मोहाची आसक्ती शमवत गेला दुःखे जन्मत गेली इच्छा होत राहिल्या गाभण छोट्या छोट्या सुखांमधे मी मशगुल आहे सध्या पाहू कुठले सुख ठरते माझ्या मुक्तीचे कारण कोण कुणाला जसेच्या तसे अंगिकारतो नाथा कुणास नाही येत आडवे, ज्याचे त्याचे मीपण . . (वेगवेगळे बैल जुंपले दुनियेने गाड्यांना पण सगळ्या चाकांमध्ये एकच वापरले वंगण) एकनाथ ©Eknath Dhanke
16 Love
White दृश्यांना द्रष्ट्या भावाने पाहणे शिका अन्यथा अटळ आहे आता दृष्टी जाणे एकनाथ ©Eknath Dhanke
White हे कर्ज त्याचे एवढे फेडाल कोठे मिळतो असा फुकटात अस्सल माल कोठे इकडे उभी आधीच टोळी लांडग्यांची तिकडून आला वाघ तर धावाल कोठे आत्ताच कापा पंख जर कापायचे तर पक्षी उडाल्यावर सुरा फिरवाल कोठे मोठीच पंचाईत झाली ऐन वेळी तलवार दिसली पण दिसेना ढाल कोठे नाही कळाला अजुनही धोका तुम्हाला रस्ते अजुन झालेत तुमचे लाल कोठे आनंद झाला आज आल्यावर तुम्ही पण इतकेच सांगा सर्व होता काल कोठे घेऊन मी आलोच नाथा एक श्रीफळ तोवर पहा तू भेटते का शाल कोठे एकनाथ ©Eknath Dhanke
9 Love
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here