महाराष्ट्राच्या मातीतला जन्म अमुचा
आम्हा कशाला हवी कुणाची प्रेरणा..
सूरवात कशी करावी वाटत असेल
तर त्याच उत्तम उदाहरण किल्ले तोरणा..
सामर्थ्याचा उत्तम उदाहरण
आजही उभा तो प्रतापगड..
अफजल्याला उभा फाडून
पायथ्याशी पुरल त्याच धड...
कधी अडचणींना घबरलात तर
विशाळगडाची याद करा ताजी..
मरणालाही आडवाटेत थांबवून
प्रणनिशी लढले होते अमुचे बाजी..
नवनिर्माणाची असेल ध्यास
तर जगात काहीच नसतं जड..
याच उत्तम उदाहरण असेल
तर महाराजांचा राजगड..
आयुष्यात सर्वांच्याच येतात दुःख
त्यांना ताठ मानेनं असतं नडायच..
आठवून प्रताप सिंहगडाचा
तानाजी रावांसारखं लढायच..
जेव्हा सर्वच संपल अस वाटेल
तेव्हा रायगडाला जाऊन राहायचं...
महाराजांच्या संपूर्ण आयुष्याला
एक प्रेरणा म्हणून पहायचं....
©अरुण मुंढे