तुला जमेल तसं ये आणि घेऊन जा, आणि मी फोन ठेवला...तिनं घरीही सांगून ठेवलेलं,
मी गेल्यावर कुणीही रडायचं नाही, नाहीतर तिही रडत राहणार, दु:खी राहणार,
म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते, फक्त तिच्यासाठीच...!!!
मग मी तिच्या घरी जाऊन ती चिट्टी घेऊन आलो...
चिट्टी -खरं सांगू जाता जाता, तुझी खूप आठवण येत होती,
कदाचित तू येशील म्हणून,जीव तुझ्यात अडकून राहिला होता, पण तू नाही आलास, मग विचार केला,
तुझ्यासाठी जाता जाता, काहीतरी बोलून जावं,
मला खात्री होती, तू हे नक्की वाचशील..!!!
या जन्मात मी तुझी होऊ शकली नाही...
पण पुढच्या जन्मी माझा होशील ना रे...?
#ShiningInDark