आतापर्यंत सोबत असलेला
लख्खं उजेड नाहीसा होतो...
आणि सभोवताली पसरतो
अंधार काळाकुट्ट...
चालताना मध्येच कुठेतरी
पाय ठेचाळतो,
पायातल्या चपलेला भेदून
आरपार जातो एक काटा...
क्षणारार्धात जाते एक
जीवघेणी कळ डोक्यापर्यंत...
काटा काढताना खुडून गेल्यावर
ठणकत राहते ती जागा
आणि लवकर काटा निघाला नाही
तर कुरूप होऊन बसते.
आयुष्याच्या वाटेवर चालताना
असे अनेक काटे रूततात.
पण आपण एकटे कुठे आहोत असे?
अंधारलेल्या वाटेवरून चालताना
एक भरोसा पुरेसा असतो...
या अंधाराच्या पुढे नक्कीच
एक उजेडानं भरलेलं आभाळ आहे...
- अमोल
#कविता #अमोलशिरसाट #अकोला