अमोल

अमोल

  • Latest
  • Popular
  • Video
#अमोलशिरसाट #कविता #अकोला #poem  आतापर्यंत सोबत असलेला 
लख्खं उजेड नाहीसा होतो...
आणि सभोवताली पसरतो 
अंधार काळाकुट्ट...
चालताना मध्येच कुठेतरी 
पाय ठेचाळतो,
पायातल्या चपलेला भेदून 
आरपार जातो एक काटा...
क्षणारार्धात जाते एक 
जीवघेणी कळ डोक्यापर्यंत...
काटा काढताना खुडून गेल्यावर 
ठणकत राहते ती जागा 
आणि लवकर काटा निघाला नाही 
तर कुरूप होऊन बसते. 
आयुष्याच्या वाटेवर चालताना 
असे अनेक काटे रूततात. 
पण आपण एकटे कुठे आहोत असे?
अंधारलेल्या वाटेवरून चालताना 
एक भरोसा पुरेसा असतो...
या अंधाराच्या पुढे नक्कीच 
एक उजेडानं भरलेलं आभाळ आहे...
- अमोल
#poem  शोध तुझे तू नवीन रस्ते विषय संपला
मला पाहिजे तसे जगू दे विषय संपला

कोकीळेसही भुरळ पडावी तुझ्या गळ्याने
माझे असु दे बेसूर गाणे विषय  संपला

पत्र गुलाबी प्रेमाने पाठवा परंतू 
उत्तर जर का नाही आले विषय संपला

छान तुझा संसार चालला ; कमी कशाची ?
तिच्या घरी ती मजेत आहे विषय संपला

रात्री अपरात्रीला येते फुटून दुखणे 
रोज सकाळी जरी वाटते विषय संपला

त्रुटीत होती अडकुन फाइल महिनोमहिने
फक्त जरासे वजन ठेवले विषय संपला

वजीर गेला हत्ती घोडे प्यादे मेले 
नंतर एका चेकमेटने विषय संपला

- अमोल बी शिरसाट

शोध तुझे तू नवीन रस्ते विषय संपला मला पाहिजे तसे जगू दे विषय संपला कोकीळेसही भुरळ पडावी तुझ्या गळ्याने माझे असु दे बेसूर गाणे विषय संपला पत्र गुलाबी प्रेमाने पाठवा परंतू उत्तर जर का नाही आले विषय संपला छान तुझा संसार चालला ; कमी कशाची ? तिच्या घरी ती मजेत आहे विषय संपला रात्री अपरात्रीला येते फुटून दुखणे रोज सकाळी जरी वाटते विषय संपला त्रुटीत होती अडकुन फाइल महिनोमहिने फक्त जरासे वजन ठेवले विषय संपला वजीर गेला हत्ती घोडे प्यादे मेले नंतर एका चेकमेटने विषय संपला - अमोल बी शिरसाट

81 View

 तू गेल्यावर कुणी मनाला तितके आता भावत नाही
तू गेल्यावर कुणी फारसे स्वप्नांचा तळ गाठत नाही

सजावटीच्या वस्तूंनी भरलेली खोली आत मनाच्या
त्यात एकटी एक बाहुली दार मनाचे उघडत नाही

बाप व्हाटस्अप- माय फेसबुक - चॅटींगच्या नादात लेकरे
भरलेले घर असूनसुद्धा कुणी कुणाशी बोलत नाही

संशय जेव्हा नात्यामध्ये रुजू लागतो कणाकणाने
अशा विषारी मातीमध्ये कधी बियाणे उगवत नाही

कसे बिचारे उंच भरारी हवेत घेइल खुल्या मनाने 
नाजुकशा पंखांना इतके भारी दप्तर तोलत नाही

अमोल बी शिरसाट

तू गेल्यावर कुणी मनाला तितके आता भावत नाही तू गेल्यावर कुणी फारसे स्वप्नांचा तळ गाठत नाही सजावटीच्या वस्तूंनी भरलेली खोली आत मनाच्या त्यात एकटी एक बाहुली दार मनाचे उघडत नाही बाप व्हाटस्अप- माय फेसबुक - चॅटींगच्या नादात लेकरे भरलेले घर असूनसुद्धा कुणी कुणाशी बोलत नाही संशय जेव्हा नात्यामध्ये रुजू लागतो कणाकणाने अशा विषारी मातीमध्ये कधी बियाणे उगवत नाही कसे बिचारे उंच भरारी हवेत घेइल खुल्या मनाने नाजुकशा पंखांना इतके भारी दप्तर तोलत नाही अमोल बी शिरसाट

24,967 View

Trending Topic