एखाद्याच्या जवळ येऊन,
त्याची रोजची सवय बनून,
इतकही दूर कधी जाऊ नये
जीतून माघारी येने अशक्य होईल।
पाऊल खुणा पुसत जातात,
आठवणी मिटत जातात,
एखाद्याला इतकीही दुर्लक्ष करून नये,
ज्याने विसरणे एक सबब बनेल।
आठवणी विष बनतील,
भास बनून छळू लागतील,
मागारी यायला इतकाही वेळ लावू नये,
ती व्यक्ती आपला पर्याय शोधू लागेल।
वेळ सरत जातो,
जखम भरून येतो,
एखाधला विसरणे निमित्य बनून,
आपली जागा तिसरी व्यक्ती घेऊ लागेल।
पाटील एम.एस
#Dreams