एखाद्याच्या जवळ येऊन,
त्याची रोजची सवय बनून,
इतकही दूर कधी जाऊ नये
जीतून माघारी येने अशक्य होईल।
पाऊल खुणा पुसत जातात,
आठवणी मिटत जातात,
एखाद्याला इतकीही दुर्लक्ष करून नये,
ज्याने विसरणे एक सबब बनेल।
आठवणी विष बनतील,
भास बनून छळू लागतील,
मागारी यायला इतकाही वेळ लावू नये,
ती व्यक्ती आपला पर्याय शोधू लागेल।
वेळ सरत जातो,
जखम भरून येतो,
एखाधला विसरणे निमित्य बनून,
आपली जागा तिसरी व्यक्ती घेऊ लागेल।
पाटील एम.एस
ओझरता तिचा एक स्पर्श;
अंगावर अगणिक शहारे।
जवळून टाकलेला तिचा एक चोरटा कटाक्ष,
फुले मन मयूराचे रंगीत पिसारे।
ओठांवर उतरलेली तिची तारुण्य,
अतृप्त आणिक अधीर।
कमनीय ती, आणिक मोहक तिची काया,
नसा-नसामधुनी सळसळे धारोष्ण रुधिर।
पाटील एम.एस।
गुलाब माझ्या हृदयाचा;
श्वास बनून धरवळतोय प्रेमाचा।
गंध, तुझ्या बेधुंद तारुण्याचा;
झरणा बनून वाहतोय उत्साहाचा।
तुझ्या नजरेतील खोली, अथांग सागराचा;
खुनावतोय मज, घे उडी, जाण भेद माझ्या मनाचा।
हृदयापासून सुरू होणार प्रवास नजरेचा;
सांगतोय ग्वाही देऊन, साद मनाचा।
पाटील एम.एस।
गुलाब माझ्या हृदयाचा;
श्वास बनून धरवळतोय प्रेमाचा।
गंध, तुझ्या बेधुंद तारुण्याचा;
झरणा बनून वाहतोय उत्साहाचा।
तुझ्या नजरेतील खोली, अथांग सागराचा;
खुनावतोय मज, घे उडी, जाण भेद माझ्या मनाचा।
हृदयापासून सुरू होणार प्रवास नजरेचा;
सांगतोय ग्वाही देऊन, साद मनाचा।
पाटील एम.एस।
तुझ्या आठवणीत जेव्हा मी व्याकूळ होतो।
तुझे स्मृतीच मला सांत्वन देतात।
अंधकारात मी भरकटलो तर
आठवांचे तुझ्या चांदनेच मला उजाळा देतात।
तू नसताना ही तुझे स्पर्श मला जाणीव देतात।
निघणारा प्रत्येक श्वास, स्पंदन म्हणून धडकत राहतात।
तू असून दूर, तुझ्या सोबतीची प्रत्येक क्षण फेर धरून नाचू लागतात।
"मी एकटा" भास की;
तुझ्या सहवासाची ध्यास!!
यातच रात्र-रात्र सारतात।
पाटील एम.एस।
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here