केवळ
ना जिंकवते ना हारवते केवळ...
प्रत्येकाला वेळ शिकवते केवळ!
कुणी कुणाचा सखा सोबती नाही...
जग हे स्वार्थी सूत जुळवते केवळ!
धनदौलत भल्याभल्याची निष्ठा...
वेळप्रसंगी नियत चळवते केवळ!
वाटत असते उंदरासही सुटलो..
मांजर तर त्याला खेळवते केवळ!
खरे बोलतो खरे वागतो कायम...
खोटी वाणी मग अडखळते केवळ!
जयराम धोंगडे, नांदेड
©Jairam Dhongade
#Time