माझं तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे
हे टाळता येणार नाही..
आणि कायम सोबत राहू
हे सध्यातरी स्वीकारता येणार नाही...
माझ्या मनात फक्त आपलं नातं जपायचं आहे हे
आणि हे माझ्या मनातून काढता येणार नाही..
हा मात्र तुझ्या मनात काय चालतंय आपल्या नात्याविषयी
हे मला कधीच ठामपणे सांगता येणार नाही....
तुला हे चांगलं माहिती आहे की,
मला एकट्याला चालता येणार नाही
आणि मला हे चांगलंच माहिती आहे
तुला आपल्या नात्याविषयी उघड बोलता येणार नाही...
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
quotes on love thoughts about love failure love story a love quotes