अश्लेष माडे (प्रीत कवी )

अश्लेष माडे (प्रीत कवी ) Lives in Gondia, Maharashtra, India

कवितेच्या विश्वात रमणारा

www.instagram.com/prit_poet_ashlesh_made

  • Latest
  • Popular
  • Video

White क्षुल्लक करणावरून एखादयाचं नातं तुटण्याची वेळ यावी प्रेम इतका ही कच्चा नसावा ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#love_shayari #SAD  White क्षुल्लक करणावरून एखादयाचं नातं तुटण्याची वेळ यावी 
प्रेम इतका ही कच्चा नसावा

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#love_shayari sad quotes about life and pain alone sad dp

17 Love

शरीर उघडे पडले नागडे झाले तरीही झाकली मूठ सव्वा लाखाची एका खोलीत त्या दोघात काय घडतंय जिथे आधीच मिटते भूक शरीराची... आदर्श म्हणून रितिरिवाजात लग्न होतात पण दगा मिळते हल्ली प्रत्येकाला त्यात चूक कोणाची हातमेले झाले शरीर इथे बहुतेकांचे आधीच भावना ही मेल्या पहिल्या रात्रीच्या त्यात चूक कोणाची... आधी आणि नंतर ही लपूनछपून सगळंच होतंय त्या प्रणय क्रिडेची आस राहिली कोणाची कित्येक सुहागरात्री आता रोज होतात मग कोणाला असणार वाट त्या भावनिक पहिल्या रात्रीची... कठीण झालं हल्ली सती सावित्री मिळणं अनं कोणाला गरज उरली प्रेम करणाऱ्या पतीची प्रेम करून तर फसवणूक केली जाते उघड्या डोळ्यांनी म्हणून तर लग्नाला आवश्यकता पडते फक्त संपत्तीची... इतिहासजमा होतंय सगळं आता इथे जिथे आस होती एकव्रता पती पत्नीची ती भावनाच मरत जात आहे जी असायची पहिल्या रात्रीला आता तर फक्त Formality उरली समाजासमोर लग्नाची... खरं तर रोज बलात्कार होतात इथे अनं दखल घेतली जाते फक्त उघड्या पडलेल्या बातमीची आधी लग्नानंतर व्हायचं प्रेम आणि प्रणय मर्यादेत राहून आता तर फक्त भूक मिटवली जात आहे प्रेमाच्या नावावर शरीराची.... म्हणून प्रेम केलंत तर लग्न ही व्हायला हवं एकाशीच मग कशाला फसगत करावी कोणाची पुरुष असो किंवा स्त्री दोघांनाही हे गरजेचं असतं कारण, ईच्छा च उरली ना आता अनं भावना त्या पहिल्या स्पर्शाची... म्हणून नशिबाला आणि दुसऱ्याला दोष देत बसण्यापेक्षा हिम्मत करा खरं ते जगासमोर बोलण्याची दुसऱ्याला फसवून स्वतःची फसवणूक करण्यापेक्षा कदर करा हो आतातरी मिळणाऱ्या खऱ्या प्रेमाची... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#silhouette #SAD  शरीर उघडे पडले नागडे झाले 
तरीही झाकली मूठ सव्वा लाखाची 
एका खोलीत त्या दोघात काय घडतंय 
जिथे आधीच मिटते भूक शरीराची...

आदर्श म्हणून रितिरिवाजात लग्न होतात 
पण दगा मिळते हल्ली प्रत्येकाला त्यात चूक कोणाची 
हातमेले झाले शरीर इथे बहुतेकांचे आधीच 
भावना ही मेल्या पहिल्या रात्रीच्या त्यात चूक कोणाची...

आधी आणि नंतर ही लपूनछपून सगळंच होतंय 
त्या प्रणय क्रिडेची आस राहिली कोणाची 
कित्येक सुहागरात्री आता रोज होतात 
मग कोणाला असणार वाट त्या भावनिक पहिल्या रात्रीची...

कठीण झालं हल्ली सती सावित्री मिळणं 
अनं कोणाला गरज उरली प्रेम करणाऱ्या पतीची 
प्रेम करून तर फसवणूक केली जाते उघड्या डोळ्यांनी 
म्हणून तर लग्नाला आवश्यकता पडते फक्त संपत्तीची...

इतिहासजमा होतंय सगळं आता इथे 
जिथे आस होती एकव्रता पती पत्नीची 
ती भावनाच मरत जात आहे जी असायची पहिल्या रात्रीला 
आता तर फक्त Formality उरली समाजासमोर लग्नाची...

खरं तर रोज बलात्कार होतात इथे 
अनं दखल घेतली जाते फक्त उघड्या पडलेल्या बातमीची 
आधी लग्नानंतर व्हायचं प्रेम आणि प्रणय मर्यादेत राहून 
आता तर फक्त भूक मिटवली जात आहे प्रेमाच्या नावावर शरीराची....

म्हणून प्रेम केलंत तर लग्न ही व्हायला हवं एकाशीच 
मग कशाला फसगत करावी कोणाची 
पुरुष असो किंवा स्त्री दोघांनाही हे गरजेचं असतं 
कारण, ईच्छा च उरली ना आता अनं भावना त्या पहिल्या स्पर्शाची...

म्हणून नशिबाला आणि दुसऱ्याला दोष देत बसण्यापेक्षा 
हिम्मत करा खरं ते जगासमोर बोलण्याची 
दुसऱ्याला फसवून स्वतःची फसवणूक करण्यापेक्षा 
कदर करा हो आतातरी मिळणाऱ्या खऱ्या प्रेमाची...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#silhouette sad shayari very sad love quotes in hindi sad status in hindi Extraterrestrial life sad status

9 Love

White लग्न कर आणि मोकळा हो असं सगळेच म्हणतात मला असेल कुणी बघितलेली तर सांग घेऊन येऊ तिलाच बोलतात मला.. वाटतं तितकं सोपं नसतं ना तरी लोकांचं बोलणं कळतं मला घेऊन येऊ बोलणं सोपं असतं पण मनात नसताना आणायचं कोणाला? लग्न म्हणजे दोन दिवसांचा कार्यक्रम नव्हे कारण,आयुष्य कसं असतं कळतं मला मरेपर्यंत Adjust करावं लागतं ना कसं सांगावं हे ह्या समाजाला... लग्न म्हणजे बाहुला बाहुली चं खेळ नाही सारं काही पटवावं लागतं मनाला घेऊन येऊ तिला म्हणणं सोपं वाटतं इतरांना पण, कळेल कसं जातीपातीच्या कचाट्यात सापडलेल्या समाजाला... माणूस सोडून सारं काही बघतात इथे महत्व फक्त जातपात श्रीमंती नोकरी आणि पैशाला हवी अशी मुलगी आयुष्यात कायमची सगळं सोडून जी येईल फक्त महत्व देऊन मला... प्रेम इथे कोणावरही केलं जातं काहीच न बघता पण खूप काही बघितलं जातं लग्नाला जग एका बाजूने आणि माझे मत वेगळे म्हणून घाई करून कष्ट नको माझ्या मनाला... वय वाढत जातं जिम्मेदाऱ्या वाढतात आणि हे सगळंच कळतंय मला पण, लोकांना वाटतं तितकं सोपं नसतं हल्ली खूप काही हवं असतं लग्नासाठी मुलाकडून मुलीला.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#love_shayari  White लग्न कर आणि मोकळा हो 
असं सगळेच म्हणतात मला 
असेल कुणी बघितलेली तर सांग 
घेऊन येऊ तिलाच बोलतात मला..

वाटतं तितकं सोपं नसतं ना 
तरी लोकांचं बोलणं कळतं मला 
घेऊन येऊ बोलणं सोपं असतं 
पण मनात नसताना आणायचं कोणाला?

लग्न म्हणजे दोन दिवसांचा कार्यक्रम नव्हे 
कारण,आयुष्य कसं असतं कळतं मला 
मरेपर्यंत Adjust करावं लागतं ना 
कसं सांगावं हे ह्या समाजाला...

लग्न म्हणजे बाहुला बाहुली चं खेळ नाही 
सारं काही पटवावं लागतं मनाला 
घेऊन येऊ तिला म्हणणं सोपं वाटतं इतरांना 
पण, कळेल कसं जातीपातीच्या कचाट्यात सापडलेल्या समाजाला...

माणूस सोडून सारं काही बघतात इथे 
महत्व फक्त जातपात श्रीमंती नोकरी आणि पैशाला 
हवी अशी मुलगी आयुष्यात कायमची 
सगळं सोडून जी येईल फक्त महत्व देऊन मला...

प्रेम इथे कोणावरही केलं जातं काहीच न बघता 
पण खूप काही बघितलं जातं लग्नाला 
जग एका बाजूने आणि माझे मत वेगळे 
म्हणून घाई करून कष्ट नको माझ्या मनाला...

वय वाढत जातं जिम्मेदाऱ्या वाढतात 
आणि हे सगळंच कळतंय मला 
पण, लोकांना वाटतं तितकं सोपं नसतं 
हल्ली खूप काही हवं असतं लग्नासाठी मुलाकडून मुलीला....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#love_shayari in life quotes positive life quotes life quotes life quotes in marathi life shayari in hindi

15 Love

White काहीही मिळवायची इच्छाशक्ती जर मनापासून असेल तर ते मिळवायला कुणीही अडवू शकत नाही.. हा मिळवताना मात्र अनेक अडचणी येतील काही दुरावतील काही जवळ येतील, काही मिळवताना काहीतरी सुटेलच, हवं असलेलं नक्की मिळेलच फक्त प्रयत्न न करता हार मानू नका कारण, अंगात काही मिळवायची धमक असली की कुणीच अडवू शकत नाही हे नक्की बहाणा हा फक्त प्रयत्न न करणाऱ्यांसाठी असतो आणि मिळवणाऱ्यांना रस्ता नक्की दिसतो.. आणि कारणे देणारा मनापासून प्रयत्न करत नसतो कारण त्यांना मनापासून काहीच हवं नसतो.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#sad_shayari #Quotes  White काहीही मिळवायची इच्छाशक्ती जर मनापासून असेल 
तर 
ते मिळवायला कुणीही अडवू शकत नाही..
हा मिळवताना मात्र 
अनेक अडचणी येतील 
काही दुरावतील काही जवळ येतील,
काही मिळवताना काहीतरी सुटेलच,
हवं असलेलं नक्की मिळेलच 
फक्त प्रयत्न न करता हार मानू नका 
कारण, अंगात काही मिळवायची धमक असली की 
कुणीच अडवू शकत नाही हे नक्की 
बहाणा हा फक्त प्रयत्न न करणाऱ्यांसाठी असतो
आणि मिळवणाऱ्यांना रस्ता नक्की दिसतो..
आणि कारणे देणारा मनापासून प्रयत्न करत नसतो 
कारण त्यांना मनापासून काहीच हवं नसतो....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#sad_shayari inspirational quotes quotes thoughts about love failure life quotes to love quotes

16 Love

White जगासमोर हसणारा प्रत्येक चेहरा आनंदी असतोच असं नाही मनातले दुःख आणि डोळ्यातील अश्रू लपवून परिस्थिती समोर हतबल झालेला व्यक्ती फार हसतो जगासमोर परंतु आत मध्ये घुटमळत असतो स्वतःशी लढत असतो इतरांसमोर फार व्यक्त न होता.. रडत असतो मनातल्या मनात कोणालाही दुःखाचा एक कण न दिसू देता जगत असतो परिस्थिती सोबत लढत झगडत आणि स्वतःला दोष देत.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#sad_quotes #SAD  White जगासमोर हसणारा प्रत्येक चेहरा आनंदी असतोच असं नाही 
मनातले दुःख आणि डोळ्यातील अश्रू लपवून 
परिस्थिती समोर हतबल झालेला व्यक्ती 
फार हसतो जगासमोर 
परंतु आत मध्ये घुटमळत असतो 
स्वतःशी लढत असतो 
इतरांसमोर फार व्यक्त न होता..
रडत असतो मनातल्या मनात 
कोणालाही दुःखाचा एक कण न दिसू देता 
जगत असतो 
परिस्थिती सोबत लढत झगडत 
आणि स्वतःला दोष देत....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#sad_quotes very sad love quotes in hindi status for sad Entrance examination status sad

14 Love

White हवं ते मिळेल तिला तिने फक्त माझं व्हावं स्वप्नातील जग तिचं माझ्यासोबत पूर्ण व्हावं.. स्वतःसाठी मी कमी करेल तिने फक्त हवं ते मागावं वाट्टेल ते करीन तिच्यासाठी तिने फक्त माझ्यासाठी जगावं.. खूप दुःख सोसले आजवर तिने म्हणून हवं ते सुख तिला मिळावं साऱ्या बांधनातून मुक्त होऊन तिने कायमची माझ्याजवळ यावं.. फुलासारखं जपणार सारी जिंदगी तिला फक्त प्रेमाचा तो सुगंध तिने मला द्यावं एक पाकळी सुद्धा गळू देणार नाही कधी एवढं तरी विश्वास तिने माझ्यावर करावं... प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार मी तिचे तिने फक्त शेवटपर्यंत माझं प्रेम जपावं अर्ध्यात मला सोडून न जाता कधी तिने ही आपलं खरं प्रेम सिद्ध करावं.. स्वार्थी प्रेम करणारे अनेक पाहिले आजवर म्हणून स्वतःचे वेगळेपण तिने दाखवून द्यावं प्रवाहाप्रमाणे इतरांसारखी वाहत न जाता जगाबरोबर मरेपर्यंत सोबतीचं मला वचन तिने द्यावं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#love_shayari  White हवं ते मिळेल तिला 
तिने फक्त माझं व्हावं 
स्वप्नातील जग तिचं 
माझ्यासोबत पूर्ण व्हावं..

स्वतःसाठी मी कमी करेल 
तिने फक्त हवं ते मागावं 
वाट्टेल ते करीन तिच्यासाठी 
तिने फक्त माझ्यासाठी जगावं..

खूप दुःख सोसले आजवर तिने 
म्हणून हवं ते सुख तिला मिळावं 
साऱ्या बांधनातून मुक्त होऊन 
तिने कायमची माझ्याजवळ यावं..

फुलासारखं जपणार सारी जिंदगी तिला 
फक्त प्रेमाचा तो सुगंध तिने मला द्यावं 
एक पाकळी सुद्धा गळू देणार नाही कधी 
 एवढं तरी विश्वास तिने माझ्यावर करावं...

प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार मी तिचे 
तिने फक्त शेवटपर्यंत माझं प्रेम जपावं 
अर्ध्यात मला सोडून न जाता कधी 
तिने ही आपलं खरं प्रेम सिद्ध करावं..

स्वार्थी प्रेम करणारे अनेक पाहिले आजवर 
म्हणून स्वतःचे वेगळेपण तिने दाखवून द्यावं 
प्रवाहाप्रमाणे इतरांसारखी वाहत न जाता जगाबरोबर 
मरेपर्यंत सोबतीचं मला वचन तिने द्यावं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#love_shayari love story quote on love love status sad love shayari

18 Love

Trending Topic