गडद गहिऱ्या अंधाराच्या
मखमली सावल्या थांबल्या
पाठमोरी भार उन्हाचा
चिंब पदराआड लांबल्या!१!
सैल मोकळ्या जटा रेशमी
हळूच पूसती गूज कानी
शामल वर्णी गंध दाटला
मंद हासतो पानोपानी!२!
अधरी अवचित जुळून आले
गीत प्रसवले तुला माळले
धागां–धागां गुंफून हृदयी
चित्र देखणे साकार झाले!३!
विणेच्या झंकारून तारा
सूर छेडले तेच जुने
काय गवसले मजला आता?
भरली ओंजळ नसे उणे!४!
नक्षत्रांच्या शुभ्र मृत्तिका
पहाट वेळी ओघळल्या
दवबिंदूचे मोती बनूनी
धुक्यात हिरव्या झाकोळल्या !५!
©Shankar Kamble
#Ray #रात्रि #रात #सखा #प्रियकर #कृष्ण #सखी #आठवण #याद