Shankar Kamble

Shankar Kamble

  • Latest
  • Popular
  • Video

मीच माझ्या वांझ मनाशी एक करार केला आहे श्वासापुरते जगणे केवळ लयास माणूस गेला आहे... नकोच उसन्या सुखदुःखाची रंगीत झालर चमचमणारी श्रावण सरता वैशाखाची दाह,होरपळ धूसमुसणारी... रोज पाहतो त्याच राऊळी तीच प्रभावळ तो वनमाळी लोभ, वासना दंभपणाची भणंग घेऊन फिरतो झोळी... कांगोऱ्यांनी सजले –नटले खुले अंगण निळ्या नभाचे बिंब उमटता रक्त वर्णी ते कोश लोपले गर्द ढगाचे... उगाच वाटे डोळ्यामधला पाझर आता आटून गेला किती पेरले कोंब तरीही तळ मनाचा सुकून गेला... एकच जीवन एकच जगणे एक धून पण कैक तराने रंगमंच हा युगा युगांचा पडदा पडता येणे– जाणे... ©Shankar Kamble

#माणूसम्हणूनजगताना #जीवनअनुभव #अस्तित्व #प्रेम #चिंतन #माणूस  मीच माझ्या वांझ मनाशी एक करार केला आहे
श्वासापुरते जगणे केवळ लयास माणूस गेला आहे...

नकोच उसन्या सुखदुःखाची रंगीत झालर चमचमणारी
श्रावण सरता वैशाखाची दाह,होरपळ धूसमुसणारी...

रोज पाहतो त्याच राऊळी तीच प्रभावळ तो वनमाळी
लोभ, वासना दंभपणाची भणंग घेऊन फिरतो झोळी...

कांगोऱ्यांनी सजले –नटले खुले अंगण निळ्या नभाचे
बिंब उमटता रक्त वर्णी ते कोश लोपले गर्द ढगाचे...

उगाच वाटे डोळ्यामधला पाझर आता आटून गेला
किती पेरले कोंब तरीही तळ मनाचा सुकून गेला...

एकच जीवन एकच जगणे एक धून पण कैक तराने
रंगमंच हा युगा युगांचा पडदा पडता येणे– जाणे...

©Shankar Kamble

आवेशाच्या ललकारीने काताळाला कंप सुटावा युगा–युगांच्या हुंदक्यातला विटाळ आता तरी फिटावा... साथ–सोबत नको कुणाची नकोच उसने बळ आता पिचलेल्या मनगटांत फिरुनी बंड पेरूया जाता जाता... क्षणा–क्षणाला उसळत राही तप्त लाव्हां छातीमधला पुन्हा चेतवू जुने निखारे रात्र काजळी तुम्हीच बदला... शिंग तुतारी नौबत झडली नाद टापे गगनी भरली लख्ख तळपत्या समशेरींना चेव, विरश्री अंगी स्फुरली... तृणापरी पायात चिरडू यश किर्तीची शिखरे घडवू मळभ सारुनी लाचारीचे स्वाभिमाने कोंदण जडवू... ©Shankar Kamble

#मराठीविचार #अस्तित्व #संघर्ष #युद्ध #तलवार #टक्कर  आवेशाच्या ललकारीने काताळाला कंप सुटावा
युगा–युगांच्या हुंदक्यातला विटाळ आता तरी फिटावा...

साथ–सोबत नको कुणाची नकोच उसने बळ आता
पिचलेल्या मनगटांत फिरुनी बंड पेरूया जाता जाता...

क्षणा–क्षणाला उसळत राही तप्त लाव्हां छातीमधला
पुन्हा चेतवू जुने निखारे रात्र काजळी तुम्हीच बदला...

शिंग तुतारी नौबत झडली नाद टापे गगनी भरली
लख्ख तळपत्या समशेरींना चेव, विरश्री अंगी स्फुरली...

तृणापरी पायात चिरडू यश किर्तीची शिखरे घडवू
मळभ सारुनी लाचारीचे स्वाभिमाने कोंदण जडवू...

©Shankar Kamble

शापित यक्ष... शामलवर्णी अस्तर ओढून गूढ नभाचे तेज लोपले झरोक्यातूनी डोकावत का अनोळखी मी बिंब गोपले.. उगां वाटते वठल्या झाडां कधी तरी येईल पालवी आस मनीची सुकते तेंव्हा वसंत जेंव्हा गरळ कालवी.. कैक फुलांचे कैक ताटवे स्वैर मुखाने दिशा चुंबिती कोश पांघरूण खुळा भ्रमर तो राग वीराणी सर गुंफिती.. विलुप्त झाल्या खुणा गहिऱ्या मागमूस ना मातीला आत कोंदला गंध कस्तुरी कळ युगाची छातीला.. चमचमणारे मंद काजवे भार पेलती नक्षत्रांचा शापित यक्ष पैलतीरी मी श्राप भोगतो आठवांचा.. ©Shankar Kamble

#मराठीकविता #जीवनअनुभव #काव्य #एकाकी #शापित #सुमन  शापित यक्ष...

शामलवर्णी अस्तर ओढून
गूढ नभाचे तेज लोपले
झरोक्यातूनी डोकावत का
अनोळखी मी बिंब गोपले..

उगां वाटते वठल्या झाडां
कधी तरी येईल पालवी
आस मनीची सुकते तेंव्हा
वसंत जेंव्हा गरळ कालवी..

कैक फुलांचे कैक ताटवे
स्वैर मुखाने दिशा चुंबिती
कोश पांघरूण खुळा भ्रमर तो
राग वीराणी सर गुंफिती..

विलुप्त झाल्या खुणा गहिऱ्या
मागमूस ना मातीला
आत कोंदला गंध कस्तुरी
कळ युगाची छातीला..

चमचमणारे मंद काजवे
भार पेलती नक्षत्रांचा
शापित यक्ष पैलतीरी मी
श्राप भोगतो आठवांचा..

©Shankar Kamble

गझल... जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले ©Shankar Kamble

#मराठीप्रेम #जीवनअनुभव #MerryChristmas #सत्य #जीवन #कोणी  गझल...

जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले
बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले

गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले
डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले

जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी
नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले

गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची
नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले

रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने
शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले

शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा
खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले

कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला
एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले

#मराठीकविता #मराठीप्रेम #जीवनअनुभव #दुरावा #जीवन #जगणे  गझल...

जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले
बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले

गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले
डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले

जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी
नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले

गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची
नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले

रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने
शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले

शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा
खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले

कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला
एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले

©Shankar Kamble

गडद गहिऱ्या अंधाराच्या मखमली सावल्या थांबल्या पाठमोरी भार उन्हाचा चिंब पदराआड लांबल्या!१! सैल मोकळ्या जटा रेशमी हळूच पूसती गूज कानी शामल वर्णी गंध दाटला मंद हासतो पानोपानी!२! अधरी अवचित जुळून आले गीत प्रसवले तुला माळले धागां–धागां गुंफून हृदयी चित्र देखणे साकार झाले!३! विणेच्या झंकारून तारा सूर छेडले तेच जुने काय गवसले मजला आता? भरली ओंजळ नसे उणे!४! नक्षत्रांच्या शुभ्र मृत्तिका पहाट वेळी ओघळल्या दवबिंदूचे मोती बनूनी धुक्यात हिरव्या झाकोळल्या !५! ©Shankar Kamble

#मराठीप्रेम #प्रियकर #रात्रि #कृष्ण #आठवण  गडद गहिऱ्या अंधाराच्या
मखमली सावल्या थांबल्या
पाठमोरी भार उन्हाचा
चिंब पदराआड लांबल्या!१!

सैल मोकळ्या जटा रेशमी
हळूच पूसती गूज कानी
शामल वर्णी गंध दाटला
मंद हासतो पानोपानी!२!

अधरी अवचित जुळून आले
गीत प्रसवले तुला माळले 
धागां–धागां गुंफून हृदयी
चित्र देखणे साकार झाले!३!

विणेच्या झंकारून तारा 
सूर छेडले तेच जुने
काय गवसले मजला आता?
भरली ओंजळ नसे उणे!४!

नक्षत्रांच्या शुभ्र मृत्तिका
पहाट वेळी ओघळल्या
दवबिंदूचे मोती बनूनी
धुक्यात हिरव्या झाकोळल्या !५!

©Shankar Kamble
Trending Topic