बाप्पा ही कसली रे रीत? एक दिवस मोठ्या आनंदाने थाटा
  • Latest
  • Popular
  • Video

बाप्पा ही कसली रे रीत? एक दिवस मोठ्या आनंदाने थाटामाटात आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन यायचं, तुझे सगळे लाड करायचे, तुझ्या आवडीचा खाऊ करून तुला मोठ्या मायेनं खाऊ घालायचं, भक्तीभावाने तुझी पुजा आरती करायची आणि एवढा जीव लावून एक दिवस तुला निरोप द्यायचा! या दहा दिवसांत हवी तेवढी मौज करता करता नकळत विसरच पडतो की तू आलायस तो काही कायमचा नाही! या उत्साहात हे दहा दिवस कसे सरतात काही कळतच नाही. पण ए बाप्पा, तुला खरं सांगू? मी मोठी तर झाले पण तुला निरोप देण्याची वेळ आली की जीवाची होणारी घालमेल अजूनही तीच आहे. अजूनही तुझी शेवटची आरती करताना कंठ दाटून येतोच. बालपणी किती बरं होतं, नाही? "माझ्या देवबाप्पाला नका ना हो नेऊ " म्हणत रडून रडून घर डोक्यावर घ्यायचे, तुला बिलगून "देवबाप्पा, थांब ना रे. नको ना जाऊस" म्हणत हट्ट करायचा. हो, हे आहेच की कितीही रडले तरी तू थांबत नव्हतासच; पण निदान तुला बिलगून रडून घेतलं की मन मोकळं होत होतं. पण आता, आता मात्र तसं करता येत नाही. आता तुझी शेवटची आरती करताना दाटून आलेला कंठ रडून मोकळा करता येत नाही. डोळ्यांत आलेले अश्रू पापण्यांची उघडझाप करून गुपचूप आत ढकलावे लागतात. फुटलेला हुंदका ढोल ताशांच्या गजरात दडवावा लागतो. मग मन स्वतःच स्वतःला समजावतं की 'बाप्पा चाललाय तो परत येण्यासाठीच!' आणि मग काय, हसतमुखाने सगळं विसरून वाजतगाजत, जयघोष करत निघते माझ्या लाडक्या बाप्पाची मिरवणुक. नाचत नाचत मिरवणुक पाण्यापर्यंत जाते खरी, पण ती तुझी गोंडस-गोजिरवाणी मुर्ती नजरेआड करायला मन मानत नाही रे अजूनही. आजही तुझं विसर्जन करताना अश्रू पापण्यांचे बांध ओलांडून येतातच गालावर, आणि निरोप देताना आजही मन तुला तेच लडिवाळ आर्जव करत, "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!". - संचिता नितीन गड्डमवार ✍️ ©sanchita gaddamwar

#मराठीविचार  बाप्पा ही कसली रे रीत? एक दिवस मोठ्या आनंदाने थाटामाटात आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन यायचं, तुझे सगळे लाड करायचे, तुझ्या आवडीचा खाऊ करून तुला मोठ्या मायेनं खाऊ घालायचं, भक्तीभावाने तुझी पुजा आरती करायची आणि एवढा जीव लावून एक दिवस तुला निरोप द्यायचा!
या दहा दिवसांत हवी तेवढी मौज करता करता नकळत विसरच पडतो की तू आलायस तो काही कायमचा नाही! या उत्साहात हे दहा दिवस कसे सरतात काही कळतच नाही.
             पण ए बाप्पा, तुला खरं सांगू? मी मोठी तर झाले पण तुला निरोप देण्याची वेळ आली की  जीवाची होणारी घालमेल अजूनही तीच आहे. अजूनही तुझी शेवटची आरती करताना कंठ दाटून येतोच. बालपणी किती बरं होतं, नाही? "माझ्या देवबाप्पाला नका ना हो नेऊ " म्हणत रडून रडून घर डोक्यावर घ्यायचे, तुला बिलगून "देवबाप्पा, थांब ना रे. नको ना जाऊस" म्हणत हट्ट करायचा.
 हो, हे आहेच की कितीही रडले तरी तू थांबत नव्हतासच; पण निदान तुला बिलगून रडून घेतलं की मन मोकळं होत होतं. 
                पण आता, आता मात्र तसं  करता येत नाही. आता तुझी शेवटची आरती करताना दाटून आलेला कंठ रडून मोकळा करता येत नाही. डोळ्यांत आलेले अश्रू पापण्यांची उघडझाप करून गुपचूप आत ढकलावे लागतात. फुटलेला हुंदका ढोल ताशांच्या गजरात दडवावा लागतो. मग मन स्वतःच स्वतःला समजावतं की 'बाप्पा चाललाय तो परत येण्यासाठीच!' आणि मग काय, हसतमुखाने सगळं विसरून वाजतगाजत, जयघोष करत निघते माझ्या लाडक्या बाप्पाची मिरवणुक. नाचत नाचत मिरवणुक पाण्यापर्यंत जाते खरी, पण ती तुझी गोंडस-गोजिरवाणी मुर्ती नजरेआड करायला मन मानत नाही रे अजूनही. आजही तुझं विसर्जन करताना अश्रू पापण्यांचे बांध ओलांडून येतातच गालावर, आणि निरोप देताना आजही मन तुला तेच लडिवाळ आर्जव करत, "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!".  
                                                                      
                                            - संचिता नितीन गड्डमवार ✍️

©sanchita gaddamwar

बाप्पा ही कसली रे रीत? एक दिवस मोठ्या आनंदाने थाटामाटात आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन यायचं, तुझे सगळे लाड करायचे, तुझ्या आवडीचा खाऊ करून तुला मोठ्या मायेनं खाऊ घालायचं, भक्तीभावाने तुझी पुजा आरती करायची आणि एवढा जीव लावून एक दिवस तुला निरोप द्यायचा! या दहा दिवसांत हवी तेवढी मौज करता करता नकळत विसरच पडतो की तू आलायस तो काही कायमचा नाही! या उत्साहात हे दहा दिवस कसे सरतात काही कळतच नाही. पण ए बाप्पा, तुला खरं सांगू? मी मोठी तर झाले पण तुला निरोप देण्याची वेळ आली की जीवाची होणारी घालमेल अजूनही तीच आहे. अजूनही तुझी शेवटची आरती करताना कंठ दाटून येतोच. बालपणी किती बरं होतं, नाही? "माझ्या देवबाप्पाला नका ना हो नेऊ " म्हणत रडून रडून घर डोक्यावर घ्यायचे, तुला बिलगून "देवबाप्पा, थांब ना रे. नको ना जाऊस" म्हणत हट्ट करायचा. हो, हे आहेच की कितीही रडले तरी तू थांबत नव्हतासच; पण निदान तुला बिलगून रडून घेतलं की मन मोकळं होत होतं. पण आता, आता मात्र तसं करता येत नाही. आता तुझी शेवटची आरती करताना दाटून आलेला कंठ रडून मोकळा करता येत नाही. डोळ्यांत आलेले अश्रू पापण्यांची उघडझाप करून गुपचूप आत ढकलावे लागतात. फुटलेला हुंदका ढोल ताशांच्या गजरात दडवावा लागतो. मग मन स्वतःच स्वतःला समजावतं की 'बाप्पा चाललाय तो परत येण्यासाठीच!' आणि मग काय, हसतमुखाने सगळं विसरून वाजतगाजत, जयघोष करत निघते माझ्या लाडक्या बाप्पाची मिरवणुक. नाचत नाचत मिरवणुक पाण्यापर्यंत जाते खरी, पण ती तुझी गोंडस-गोजिरवाणी मुर्ती नजरेआड करायला मन मानत नाही रे अजूनही. आजही तुझं विसर्जन करताना अश्रू पापण्यांचे बांध ओलांडून येतातच गालावर, आणि निरोप देताना आजही मन तुला तेच लडिवाळ आर्जव करत, "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!". - संचिता नितीन गड्डमवार ✍️ ©sanchita gaddamwar

12 Love

Trending Topic