कोण काय म्हणतो
याचा विचार
मी कधी करत नाही
शंभर असतात आजूबाजूला
हिशोबात त्यांना कधी
मी धरत नाही....
खूप मोठा नाही
पण इतकाही छोटा नाही...
आनंद चेहऱ्यावरचा
कधी सरत नाही
त्यामुळेच म्हणा
मी कधी हरत नाही....
गोठोडे आहे खुपसाऱ्या
आठवणींचे व अनुभवाचे
जे नाही त्यासाठी
कधी मी झुरत नाही..
नका मोजून पाहू मला
कोणत्याच मापात
मी पुरत नाही...
खूपदा फसतो..
स्वतशीच हसतो
हौस माझीही
कधी जिरत नाही
असेल तेवढे मोजून देतो
जवळ काही कधी उरत नाही
अनंत दुःख अनंत अडचणी
पण रडत कधी फिरत नाही
चुटकीत विषय करतो पूर्ण
जास्त खोलात मी कधी शिरत नाही...
राजकुमार मुंडे,जालना
09/05/2022
©Rajkumar Mundhe
#Moon