फक्त लिहायचा एक छोटासा निबंध' (पोर्शे कार अपघा | मराठी कविता

"'फक्त लिहायचा एक छोटासा निबंध' (पोर्शे कार अपघात ) पैशाच्या धुंदीपायी डोक्यात यांच्या नशा , पैशाच्या धुंदीपाई उद्धट यांची भाषा . कोणालाही उडवायचं होऊनिया बेधुंद , कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... मरणारे मरतात,रडणारे रडतात , जामीनावर हे रात्रीत बाहेर पडतात . पिझ्झा,बर्गर खाऊन साजरा करतात आनंद , कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... पैशाच्या मोहापायी विकला जातो न्याय, निर्दोष असून आमच्यावर होतो मग अन्याय . 2 बळी घेऊन सुध्या होत नाही दंड, कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... घरच्यांचा धाक नाही,पैसे द्यायला माप नाही , पोर्शे चालवणार,दारू पिणार मीच आहे भाई. पैसे देऊन सगळ्यांचे तोंड करणार बंद, कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... दारू पिणारे पीत राहणार ,गुन्हे ही होत राहणार . निरपराधी माणसांची ,पुन्हा शिकार होणार . कधी उघडतील आमच्या न्यायव्यवस्थेचे डोळे ? कधी थांबतील असे निबंध लिहायचे चाळे !.... -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh"

 'फक्त लिहायचा एक छोटासा निबंध'
   (पोर्शे कार अपघात )

पैशाच्या धुंदीपायी डोक्यात यांच्या नशा ,
   पैशाच्या धुंदीपाई उद्धट यांची भाषा .
कोणालाही उडवायचं होऊनिया बेधुंद ,
                 कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध...

मरणारे मरतात,रडणारे रडतात ,
         जामीनावर हे रात्रीत बाहेर पडतात .
पिझ्झा,बर्गर खाऊन साजरा करतात आनंद ,
            कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध...

पैशाच्या मोहापायी विकला जातो न्याय, 
         निर्दोष असून आमच्यावर होतो मग अन्याय .
2 बळी घेऊन सुध्या होत नाही दंड, 
                    कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध...

घरच्यांचा धाक नाही,पैसे द्यायला माप नाही ,
          पोर्शे चालवणार,दारू पिणार मीच आहे भाई.
पैसे देऊन सगळ्यांचे तोंड करणार बंद,
             कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध...

दारू पिणारे पीत राहणार ,गुन्हे ही होत राहणार .
     निरपराधी माणसांची ,पुन्हा शिकार होणार .
कधी उघडतील आमच्या न्यायव्यवस्थेचे डोळे ?
         कधी थांबतील असे निबंध लिहायचे चाळे !....

                                  -हर्षल दत्तात्रय चौधरी

©Harsh

'फक्त लिहायचा एक छोटासा निबंध' (पोर्शे कार अपघात ) पैशाच्या धुंदीपायी डोक्यात यांच्या नशा , पैशाच्या धुंदीपाई उद्धट यांची भाषा . कोणालाही उडवायचं होऊनिया बेधुंद , कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... मरणारे मरतात,रडणारे रडतात , जामीनावर हे रात्रीत बाहेर पडतात . पिझ्झा,बर्गर खाऊन साजरा करतात आनंद , कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... पैशाच्या मोहापायी विकला जातो न्याय, निर्दोष असून आमच्यावर होतो मग अन्याय . 2 बळी घेऊन सुध्या होत नाही दंड, कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... घरच्यांचा धाक नाही,पैसे द्यायला माप नाही , पोर्शे चालवणार,दारू पिणार मीच आहे भाई. पैसे देऊन सगळ्यांचे तोंड करणार बंद, कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... दारू पिणारे पीत राहणार ,गुन्हे ही होत राहणार . निरपराधी माणसांची ,पुन्हा शिकार होणार . कधी उघडतील आमच्या न्यायव्यवस्थेचे डोळे ? कधी थांबतील असे निबंध लिहायचे चाळे !.... -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh

#porsche
#punecrime
#puneaccident
#pune

People who shared love close

More like this

Trending Topic