Village Life कुरवाळण्यास येतात अश्रूं पापण्यांशी
सांग कधी झालो बेईमान सज्जनांशी
रणातले खेळ बहुतेक संपलेत आता
जो तो खेळतो आहे माझ्या भावनांशी
तेवत राहिलो दिव्यासवे तुफानात
विझतानाही दिली झुंज वादळांशी
अंधाराची भीती तू नको बाळगू मित्रा
तुझ्यासाठी केला मी करार काजव्यांशी
कष्ट करूनही आज पराजित झाला
शेवटी घामाचे होते युद्ध अत्तरांशी
सुरेश पवार
©suresh pawar
#villagelife