अंधार आणि एकांताचा जणू काहीतरी घनिष्ट सबंध असावा! या दोघांच्या सानिध्यातच माणूस अगदी शांत आणि अबोल होतो. दुनियेशी हितगुज करू पाहणारा दमलेला जीव या क्षणी स्वतःमध्येच इतका गुरफटून जातो की त्याला स्वतःचच भान राहत नाही. सुखाच्या तरंगांवर हेलकावे खात असलेली त्याची नाव बघता बघता कधी दुःखाच्या खोल दरीत कोसळते त्याचं त्यालाही समजत नाही. आणि तेव्हाच सुरू होते बुडू पाहणाऱ्या जीवाला काटावर पोहोचवण्याची केविलवाणी धडपड! पण नेमकं तिथेच तुमच्या प्रयत्नांना चपराक लगावून मिळणाऱ्या यशाला पराभूत करून तुमचाच पराजय तुमच्यावर हसू पाहतो आणि तेव्हाच मनुष्य दुःखाच्या दरीत असलेल्या वेदना आणि यातनांच्या सानिध्यात घटांगळ्या खात राहतो. अगदी निष्प्राण होईपर्यंत!
©Rushikesh bhadange
#cycle माझ्या लेखणीतून #अंधार आणि एकांत!