गझलकारी
वेदना समजायला संवेदना आधार होते...
मोठमोठे दुःख तेही सांत्वनेने पार होते!
तापते भेगाळते आक्रंदते धरती तरीही...
मेघधारा बरसल्यावर शांत हिरवीगार होते!
लाभतो एकांत जेंव्हा स्वैर होते मन विचारी...
चांगल्या वाईट साऱ्या आठवांवर स्वार होते!
राबणारा बाप व्यसनाधीन झाल्यावर बिचारी...
माय वेडी लेकरांसाठी करारी घार होते!
शब्द साधे शब्द सोपे गुंफतांना गझलकारी...
आशयाला दावणारी थोर किमयागार होते!
जयराम धोंगडे
©Jairam Dhongade
#cycle