Amruta

Amruta

Tigress

  • Latest
  • Popular
  • Video

White पाऊस दुःखाचा... रात्रीच्या अविरत पावसासारखे माझे दुःख येणार माझ्याच हृदयावर पडून ह्रदय माझे चिंब भिजवणार पहाट पुन्हा होईल आशेवर डोळे वेदनेने पाणवणार ना थांबा ना सुरुवात असच आयुष्य माझं सरणार भिजून रात्रीच्या या पावसात उभी मी तशीच राहणार हात नको कोणाचा हाती छत सोडून मी निघणार निघून गेली रात्र जरी पाऊस दुःखाचा कसा संपणार आयुष्याच्या अंताशी तरी आकाश माझे निरभ्र होणार... -अमृता ©Amruta

#मराठीकविता #sad_qoute  White पाऊस दुःखाचा... 

रात्रीच्या अविरत पावसासारखे  
माझे दुःख येणार
माझ्याच हृदयावर पडून
ह्रदय माझे चिंब भिजवणार
पहाट पुन्हा होईल आशेवर 
डोळे वेदनेने पाणवणार 
ना थांबा ना सुरुवात
असच आयुष्य माझं सरणार 
भिजून रात्रीच्या या पावसात 
उभी मी तशीच राहणार
हात नको कोणाचा हाती 
छत सोडून मी निघणार 
निघून गेली रात्र जरी 
पाऊस दुःखाचा कसा संपणार
आयुष्याच्या अंताशी तरी 
आकाश माझे निरभ्र होणार...
-अमृता

©Amruta

#sad_qoute

10 Love

White भ्रम मी माझ्या स्वप्नांच्या सावल्यांचा पाठलाग करतेय मी धावतेय, त्यांच्या जवळही जातेय आणि पाहते मी धावतेय, कारण माझी स्वप्ने झोत आहेत प्रकाशाचा एकच पाऊल पुढे फक्त... विचार असा करून मी धावतेय, कळतं नाही मला पण, मी पाठलाग का करतेय जवळ जातेय जितकी विरत जातेय सावली तितकी विरलेल्या प्रकाश्याच्या झोतात पुन्हा अडकायला मी धावतेय भ्रमाच्या भोवर्‍यात... तुटलेल्या स्वप्नांच्या जाळ्यात... ©Amruta

#मराठीकविता #Sad_Status  White भ्रम

मी माझ्या स्वप्नांच्या 
सावल्यांचा पाठलाग करतेय
मी धावतेय, 
त्यांच्या जवळही जातेय 
आणि पाहते
मी धावतेय, 
कारण माझी स्वप्ने 
झोत आहेत प्रकाशाचा 
एकच पाऊल पुढे फक्त... 
विचार असा करून 
मी धावतेय, 
कळतं नाही मला
पण, 
मी पाठलाग का करतेय  
जवळ जातेय जितकी 
विरत जातेय सावली तितकी
विरलेल्या प्रकाश्याच्या
झोतात पुन्हा अडकायला
मी धावतेय भ्रमाच्या
भोवर्‍यात... 
तुटलेल्या स्वप्नांच्या
जाळ्यात...

©Amruta

#Sad_Status मराठी कविता

9 Love

#मराठीकविता #sad_shayari  White हरलेली... 

रुक्ष आयुष्य तसच वेशीवर टांगून
दूर धुक्यात नसलेला चेहरा शोधत चाचपडत मी
काही आसवं 
म्हातारी जिर्ण पानगळी सारखी 
काही आसवं 
हिरवीगार पानापानात साठलेली मूक 
पण काळजाला भिडणारी
वाटतंय 
मी गरुडाचे पंख लावून उडतेय 
कळतंय मला मी
हतबल फाटक्या कागदाला पंख समजू‌न 
खुल्या आभाळाचा आव आणत उडतेय... 
जिंकल्याचा... आव....
खरचं
हरलेली मी...


-अमृता...

©Amruta

#sad_shayari

171 View

प्रेम आहेस तू... आयुष्याच्या वाचनालयात एक अनोखं पुस्तक आहेस तू वाचण्यात तूला जिवन घालवू शकते मी अर्थाच्या या जगात एक निरर्थक स्वप्न आहेस तू बघण्यात तूला जिवन घालवू शकते मी खोट्या प्रेमाच्या दुनियेत खऱ्या मनाचा राजा आहेस तू मनात ठेऊन तूला जिवन घालवू शकते मी माझ्या निर्जीव प्रश्नांचं कोणालाच न कळणारं उत्तर आहेस तू शोधत तूला जिवन घालवू शकते मी तहानलेल्या मला प्रेमाचं दिसणारं मृगजळ आहेस तू पिऊन तूला जिवन घालवू शकते मी पाणावलेल्या डोळ्यातून निघणार्‍या अश्रूंचं रहस्य आहेस तू उलगडत तूला जिवन संपवू शकते मी... -अमृता... ©Amruta

#मराठीकविता  प्रेम आहेस तू... 

आयुष्याच्या वाचनालयात 
एक अनोखं पुस्तक आहेस तू 
वाचण्यात तूला 
जिवन घालवू शकते मी

अर्थाच्या या जगात 
एक निरर्थक स्वप्न आहेस तू 
बघण्यात तूला 
जिवन घालवू शकते मी

खोट्या प्रेमाच्या दुनियेत 
खऱ्या मनाचा राजा आहेस तू 
मनात ठेऊन तूला 
जिवन घालवू शकते मी

माझ्या निर्जीव प्रश्नांचं 
कोणालाच न कळणारं उत्तर आहेस तू
शोधत तूला
जिवन घालवू शकते मी

तहानलेल्या मला
प्रेमाचं दिसणारं मृगजळ आहेस तू
पिऊन तूला
जिवन घालवू शकते मी

पाणावलेल्या डोळ्यातून निघणार्‍या 
अश्रूंचं रहस्य आहेस तू 
उलगडत तूला
जिवन संपवू शकते मी...

                           -अमृता...

©Amruta

प्रेम आहेस तू... आयुष्याच्या वाचनालयात एक अनोखं पुस्तक आहेस तू वाचण्यात तूला जिवन घालवू शकते मी अर्थाच्या या जगात एक निरर्थक स्वप्न आहेस तू बघण्यात तूला जिवन घालवू शकते मी खोट्या प्रेमाच्या दुनियेत खऱ्या मनाचा राजा आहेस तू मनात ठेऊन तूला जिवन घालवू शकते मी माझ्या निर्जीव प्रश्नांचं कोणालाच न कळणारं उत्तर आहेस तू शोधत तूला जिवन घालवू शकते मी तहानलेल्या मला प्रेमाचं दिसणारं मृगजळ आहेस तू पिऊन तूला जिवन घालवू शकते मी पाणावलेल्या डोळ्यातून निघणार्‍या अश्रूंचं रहस्य आहेस तू उलगडत तूला जिवन संपवू शकते मी... -अमृता... ©Amruta

15 Love

मी... आसवांच्या अभ्रात माझ्या हास्याचा पाऊस पाडणारी मी... आभासी विश्वात माझ्या वास्तव शोधणारी मी... प्रेमाच्या रंगाने माझ्या बेरंग चित्र काढणारी मी... उपेक्षेचा प्रवाहाला माझ्या तुझ्या अपेक्षेच्या समुद्रात मिळवणारी मी... राहून सोबत तुझ्या विरहात असणारी मी... ©Amruta

#मराठीकविता  मी... 

आसवांच्या अभ्रात माझ्या 
हास्याचा पाऊस पाडणारी 
मी... 

आभासी विश्वात माझ्या 
वास्तव शोधणारी 
मी... 

प्रेमाच्या रंगाने माझ्या 
बेरंग चित्र काढणारी 
मी... 

उपेक्षेचा प्रवाहाला माझ्या
तुझ्या अपेक्षेच्या समुद्रात मिळवणारी
मी... 

राहून सोबत तुझ्या
विरहात असणारी 
मी...

©Amruta

मी... आसवांच्या अभ्रात माझ्या हास्याचा पाऊस पाडणारी मी... आभासी विश्वात माझ्या वास्तव शोधणारी मी... प्रेमाच्या रंगाने माझ्या बेरंग चित्र काढणारी मी... उपेक्षेचा प्रवाहाला माझ्या तुझ्या अपेक्षेच्या समुद्रात मिळवणारी मी... राहून सोबत तुझ्या विरहात असणारी मी... ©Amruta

17 Love

तू क्षितिजाकडे डोळे लावून तुझी वाट पाहिली पण तु आला नाहीस जाताना पाठमोर्‍या तुला आर्त साद दिली पण तू ओ दिली नाहीस प्रेमासाठी झुरले तुझ्या पण तुला कधी समजलेच नाही

#twilight  तू

क्षितिजाकडे डोळे लावून 
तुझी वाट पाहिली 
पण तु आला नाहीस
जाताना पाठमोर्‍या तुला 
आर्त साद दिली 
पण तू ओ दिली नाहीस
प्रेमासाठी झुरले तुझ्या 
पण तुला कधी 
समजलेच नाही

#twilight

10 Love

Trending Topic