तूच परिपूर्ण आहेस आम्हांस एक वरदान,
नाही आम्हांस कोणतीच उपेक्षा
स्वःस्वरूपी दर्शवतोस जीवन जगायचे रहस्य ,
नाही मनी आता कोणताही उन्माद
विशाल कान जणू आम्हांस जाणवती ग्राहयशक्तीची जाण
तीक्ष्ण , सुंदर नैन भासी जशी तीक्ष्ण अन्वेषी दृष्टि
विशाल महाकाय अन् सवारी मूषक
सांगती अंकुश ठेवण्यास या चंचल जीवनास
एकदंत वक्रतुंड नाव अनेक पण तूच एक सुखकर्ता
घंटी वाजे मंदिराची पण तू तर निद्राहीन आहेस
भोग भोगायास आले मनुष्यास केलेल्या पापाचे परतफेड
म्हणूनि पाहावयास मिळतो निसर्गाचा रौद्रवतार
आता तरी बुद्धी दे रे गणराया, रक्षा कर रे तुझ्या भक्तांची
विनाश कर या राक्षसवृत्तीस घेऊनि तुझे मनुष्यरूपी अवतार
हे विघ्नहर्ता,
माझी तुझ्यावरती श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही
विश्वास आहे माझा पण अविश्वास नाही
हे गणपत्ती बाप्पा ,
रोज कोटी भक्त तुला घालती लोटांगण
त्यात माझी भर कुठे, म्हणूनी एकच मागणे
बुद्धी दे रे गणराया तुझ्या या भक्तांस
माणुसकीची जाण होऊ दे
प्रेम आनंद , सुख याचा वर्षाव होऊ दे
संकटास सामना करायचे बळ येऊ दे
सृष्टीची निर्मीती पुन:प्रस्थापित लाभो दे
नात्यात गोडवा अन् शत्रूततेचा ऱ्हास होऊ दे
एवढेच मागणे निरंतन बुद्धी दे रे गणराया अन् बुद्धी दे रे गणराया.
- रितीका वाघमारे
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here