आज माझी मुलगी मोठी झाली...!!
दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतलं होतं पहिल्यांदा,
लाडकी लेक माझी, आनंदाने सांगीतलं सगळ्यांना...
आज त्या हातांची झोळी लांब झाली,
माझी मुलगी मोठी झाली...!!
बोट धरून चालायची लाडकी लेक माझी,
वाट बघत बाबाची, उंबरठ्यावर थांबायची...
त्याची आठवण आज खूप आली,
माझी मुलगी मोठी झाली...!!
सायकलवर पुढे बसुन जायची शाळेला,
म्हणायची, बाबा याल ना मला परत न्यायला?
आज ती सायकल दिसेनाशी झाली,
माझी मुलगी मोठी झाली...!!
माया खूप लावायची,
म्हणायची, मी आहे ना तुमची आई,
आजारी पडल्यावर मात्र कुशीत शांत निजून जाई...
ती कुशीच आज हरवली,
माझी मुलगी मोठी झाली...!!
खूप शिकायची स्वप्नं पहायची,
हुशार माझी लेक छान छान खाऊही घालायची...
आज ती चव कुठे मागे राहिली,
माझी मुलगी मोठी झाली...!!
आज तीचं लग्न झालं,
ती तिच्या संसारात सुखी आहे
कुठे तरी मनाच्या कोपर्यात मात्र,
बाबाची आठवण तशीच आहे...
तिच्या संसाराची घडी पहायचीच राहिली,
आज माझी मुलगी, माझी लेक मोठी झाली...!!
पल्लवी पवार दंडवते
©pallavi pawar
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here