Babu Banarasi

Babu Banarasi

  • Latest
  • Popular
  • Video

कॉन्स्टेबल विजय जेव्हा नदीकाठावर पोहोचला तेव्हा पावसाचा जोर वाढला होता. त्याच्या सोबत त्याचे मित्र राजन, सोनू आणि सखाराम सुद्धा होते. नदीकाठावर जाऊन तिथेच चूल पेटवून मस्तपैकी मटण बनवण्याचा त्यांचा प्लॅन होता. सर्व सामान घेऊन ते घरातून निघाले. पण ते वाटेत असतानाच पावसाने हजेरी लावली व त्यांचा उत्साह ओसरला. ते जेव्हा नदीकाठी पोहोचले तेव्हा चौघेही पूर्ण भिजले होते. तिथेच गाड्या लावून ते एका मोठ्या झाडाखाली थांबले. एवढ्या दूर येऊन परत माघारी जाण्यापेक्षा पाऊस थांबायची वाट पाहत ते त्या झाडाखालीच थांबले होते. त्यांना येऊन बराच वेळ झाला होता. अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता ©Babu Banarasi

#भयकथा #भयपट  कॉन्स्टेबल विजय जेव्हा नदीकाठावर पोहोचला तेव्हा पावसाचा जोर वाढला होता. त्याच्या सोबत त्याचे मित्र राजन, सोनू आणि सखाराम सुद्धा होते. नदीकाठावर जाऊन तिथेच चूल पेटवून मस्तपैकी मटण बनवण्याचा त्यांचा प्लॅन होता. सर्व सामान घेऊन ते घरातून निघाले. पण ते वाटेत असतानाच पावसाने हजेरी लावली व त्यांचा उत्साह ओसरला. ते जेव्हा नदीकाठी पोहोचले तेव्हा चौघेही पूर्ण भिजले होते. तिथेच गाड्या लावून ते एका मोठ्या झाडाखाली थांबले. एवढ्या दूर येऊन परत माघारी जाण्यापेक्षा पाऊस थांबायची वाट पाहत ते त्या झाडाखालीच थांबले होते. त्यांना येऊन बराच वेळ झाला होता. अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता

©Babu Banarasi

बऱ्याच दिवसांनी काल मामाकडे निघालो. दोन तासाचा प्रवास, वर्षभर जाणं होत नाही. तसही मामा मामीला काहीही प्रेम राहिलेलं नाही. आजीसाठी जावं लागतं. म्हातारी गेली, तर मग तेही बंद... संध्याकाळी गेलो, गावात शिरलो, पेठेत आलो. रात्र झालेली, भरपूर पाऊस.... कलूआजीचं दार उघडं दिसलं... कलूआजीचं दार उघडं बघूनच आनंद झाला. कलूआजी म्हणजे एका अतिशय मोठ्या घराचा शेवटचा खांब. तसं बघायला गेलं, तर कलूआजी आणि माझं काहीही नातं नव्हतं, पण काही जिव्हाळ्याची नाती फार मोठी असतात. चार पिढ्यांपासून संबंध... आताच्या पिढीत घट्ट नसले, तरीही तुटले तरी नव्हते. ©Babu Banarasi

#भयकथा #भयपट  बऱ्याच दिवसांनी काल मामाकडे निघालो.
दोन तासाचा प्रवास, वर्षभर जाणं होत नाही.
तसही मामा मामीला काहीही प्रेम राहिलेलं नाही. आजीसाठी जावं लागतं.
म्हातारी गेली, तर मग तेही बंद...
संध्याकाळी गेलो, गावात शिरलो, पेठेत आलो.
रात्र झालेली, भरपूर पाऊस....
कलूआजीचं दार उघडं दिसलं...
कलूआजीचं दार उघडं बघूनच आनंद झाला.
कलूआजी म्हणजे एका अतिशय मोठ्या घराचा शेवटचा खांब. तसं बघायला गेलं, तर कलूआजी आणि माझं काहीही नातं नव्हतं, पण काही जिव्हाळ्याची नाती फार मोठी असतात.
चार पिढ्यांपासून संबंध... आताच्या पिढीत घट्ट नसले, तरीही तुटले तरी नव्हते.

©Babu Banarasi
Trending Topic