Vasundhara Jadhav

Vasundhara Jadhav

poetess

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता #वसुंधरा #बहावा  सय ग्रिष्माची जुनी जाणती
बहाव्यासंग फिरून येती
                      तू शिशिरासम पर्णहीन
                       मी ग्रिष्मासह फुलून येती
थेंब कोवळा शमवतो अग्नी
थरथरे उगा कांचन कांती 
                         अंबराची तरूल झुंबरे 
                          तप्त सोनसळी जणू ओघळती
मी शोधू आठवण कोणती 
 जर्द बहाव्यासंग  उतरती
                           उन्हास देता एक आडोसा 
                            बहावा उगा जणू खुणावती

                       - वसुंधरा

©Vasundhara Jadhav

1.You started being offline these days. आजकाल तू ऑफलाइन असतो/असते. आजकल तुम ऑफलाइन रहते हो। 2. If you harass me again. I will block you. जर मला पुन्हा त्रास दिला तर मी तुला ब्लॉक करून टाकणार. अगर मुझे फिर से तंग किया तो मैं तुम्हे ब्लॉक कर दूंगी। 3. Let's talk in the morning. चला सकाळी बोलू. चलों सुबह बात करते हैं। 4. Don't harass me by texting. मला मेसेज करून त्रास देऊ नको. मुझे मैसेज करके तंग मत करो. 5. I do not want yo talk to you. मी तुमच्याशी बोलू इच्छित नाही. मैं तुमसे बात नहीं करना चाहती। 6. Let's talk later. चल नंतर बोलूया. चलो बाद मैं बात करते हैं। 7. I have run out of my data. माझं नेट संपले आहे. मेरा नेट खत्म हो गया हैं। ©Vasundhara Jadhav

#शिक्षण #HeartBreak  1.You started being offline these days.
आजकाल तू ऑफलाइन असतो/असते.
आजकल तुम ऑफलाइन रहते हो।

2. If you harass me again. I will block you.
जर मला पुन्हा त्रास दिला तर मी तुला ब्लॉक करून टाकणार.

अगर मुझे फिर से तंग किया तो मैं तुम्हे ब्लॉक कर दूंगी।

3. Let's talk in the morning.
चला सकाळी बोलू.
चलों सुबह बात करते हैं।

4. Don't harass me by texting.
मला मेसेज करून त्रास देऊ नको.
मुझे मैसेज करके तंग मत करो.

5. I do not want yo talk to you.
मी तुमच्याशी बोलू इच्छित नाही.
मैं तुमसे बात नहीं करना चाहती।

6. Let's talk later.
 चल नंतर बोलूया.
चलो बाद मैं बात करते हैं।

7. I have run out of my data.
 माझं नेट संपले आहे.
मेरा नेट खत्म हो गया हैं।

©Vasundhara Jadhav

# Speak with Vasu #HeartBreak

10 Love

#मराठीविचार #वसु  माणसाचं मन विशाल सागरासारखं असते. त्याचं त्याचं साचणं असतं, त्याचं त्याचं घुटमळणं असतं, त्याची त्याची वादळं असतात, त्याची त्याची भरती-ओहोटी असते, त्याचा त्याचा विस्तार असतो, त्याची त्याची खोली असते. त्याच्याही खोलवर अंधार  असतो,  त्याचं भरकटणं असतं तर त्याचा किनारा असतो. त्याची त्याची निळाईही असते, त्याच चमकणंही असतं,  त्याचं सामावून घेणंही असतं, त्याच दूर लोटणंही असतं, त्याचे त्याचे  शंख, शिंपले आणि मोतीसुद्धा असतात.  

वसुंधरा जाधव

©Vasundhara Jadhav

#वसु# मी समुद्र

66 View

#मराठीकविता #दूर  तुझ्या मोकळ्या केसांचं   गच्च आभाळ दाटलं
काठ काजळी गहिरे        त्यात तुफान उठलं

श्वास थांबती मंदसा   झुले मनाचा हिंदोळा
वारा खट्याळ धुंदसा    घन मनाचा सावळा

चाल सावळ्या मनाची    फेर धरती भोवती
लडीवाळ बट तुझी      अशी अधीर सोबती

मुग्ध रेशीमस्पर्श    रोमरोमात फुलती
आडखळणारे ओठ      श्वास निशब्द गुंफती

शब्द मौनाचे लाजरे     रान पिसाट गाठलं
तुझ्यामाझ्यातल्या वेळी    दूर चांदणं सांडलं

वसु

©Vasundhara Jadhav

#दूर चांदणं सांडलं#वसुंधरा जाधव

67 View

#मराठीकविता  तुझ्या मोकळ्या केसांचं   गच्च आभाळ दाटलं
काठ काजळी गहिरे        त्यात तुफान उठलं

श्वास थांबती मंदसा   झुले मनाचा हिंदोळा
वारा खट्याळ धुंदसा    घन मनाचा सावळा

चाल सावळ्या मनाची    फेर धरती भोवती
लडीवाळ बट तुझी      अशी अधीर सोबती

मुग्ध रेशीमस्पर्श    रोमरोमात फुलती
आडखळणारे ओठ      श्वास निशब्द गुंफती

शब्द मौनाचे लाजरे     रान पिसाट गाठलं
तुझ्यामाझ्यातल्या वेळी    दुर चांदणं सांडलं

वसु

©Vasundhara Jadhav

# दूर चांदण सांडलं#वसु#

67 View

#मराठीकविता #वसुंधरा  मी तुझी वाट पाहत आहे........
संध्याकाळच्या रुणझुणणार्‍या वार्‍यासोबत
भुरभरुतायेय केस चेहर्‍यावरून
त्यातूनच झिरपतोय
तिरकस संधिप्रकाश
आणि दिवस-रात्री दरम्यानच्या या विरामाची ही कातरवेळ
आजन्म वाट पाहत असल्याची हुरहुर
आणि आर्त वादळाच काहूर
अस्वस्थ होऊन वेगाने उसळतोय
आकुंचित होऊन मनाचा सागर
उजेड आणि अंधार मिसळतोय
ढळतीय दूरवर तेजाची लकेर
मग सगळं काही शांत होईल
या आभाळाला  शामल रंग चढेल
आणि शांतता नक्कीच येईल
पण आपल्या दोन शरीराला एकत्र बांधलेल्या
आणि एकमेकांना दिलेली नजर
याशिवाय मी शांततेची कल्पनाच करू शकत नाही.
आता तुझ्याशिवाय या अस्थीरतेला स्थैर्य नाही.
तू ये मी तुझी वाट पाहत आहे.


 वसु

©Vasundhara Jadhav

# मी तुझी वाट पाहत आहे.... #वसुंधरा जाधव

125 View

Trending Topic