#TheatreDay एक अंकी, एकपात्री आयुष्यात माझ्या तू येऊन,
या आयुष्याचं दोन अंकी नाटक रचावं,
त्यात दोघांनी आपापल्या भूमिका चोख वठवाव्या,
मग व्हावा अचानक मध्यांतर,
अगदीच तोडले जावं एकमेकांपासून इतका खेचला जावा तो,
पण पुन्हा सुरू व्हावं नाटक,
पुन्हा आपण असावं रंगमंचावर समोरासमोर,
पहिल्या अंकात जितके ओळखीचे वाटावे
तितकेच अनोळखी होत जावे आपले पात्र,
आणि वेळेअगोदरच पाडला जावा पडदा...
अशाप्रकारे माझ्या एकपात्री,
पूर्णत्वाला गेलेल्या,
आयुष्यरुपी नाटकाला...
तू येऊन अपूर्णत्वाचं पांघरूण पांघरून जावं निघून,
मला कायमचं अरसिक करून...
जागतिक रंगभूमी दिन !!!
स्वप्नील हुद्दार...
.
©Swapnil Huddar
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here