बा, विठ्ठला मनाच्या  पंढरीनेही
 एकदा  उघडू  दे  नव
  • Latest
  • Popular
  • Video
#कविता  बा, विठ्ठला मनाच्या  पंढरीनेही
 एकदा  उघडू  दे  नव्या  आशेचे  दार 
रिंगणातून त्याच्याही  दवडू दे 
 अश्व प्रेम,आपुलकीचा  ..
गरीब-श्रीमंत,जात-पात
 या  सगळ्याचा  विसर पडणार्‍या 
 वैष्णवांचे वसू दे  तेथेही  घर...

यातनांच्या  अंधारात गुरफटलेल्या,
विश्वासघाताच्या आगीत  होरपळलेल्या 
जिवाला  तूच  घे  माय -माऊली  बनून  कुशीत...
दे  आता  तूच  पाठबळ
  त्याला नवचैतन्याचा टाळ घालून  गळ्यात ...

वैराग्याच्या  भीतीने  भेदरलेल्या  
जिवाच्या  भेगाळलेल्या मनाच्या
 जमिनीवर पडू दे  एकदा 
 जिद्दीचा,आत्मविश्वासाचा आषाढी  पाऊस...
फसलेली  नाती  , चुकलेल्या वाटा  मागे  टाकून.
.आशेने  धरलेल्या  नवीन  वाटेवर 
मिळू  दे  प्रेम, आनंदाने  भरलेला वारकरी  सहवास..
_sensitive_ink_

©Dr. BHAGYASHRI

बा, विठ्ठला मनाच्या पंढरीनेही एकदा उघडू दे नव्या आशेचे दार रिंगणातून त्याच्याही दवडू दे अश्व प्रेम,आपुलकीचा .. गरीब-श्रीमंत,जात-पात या सगळ्याचा विसर पडणार्‍या वैष्णवांचे वसू दे तेथेही घर... यातनांच्या अंधारात गुरफटलेल्या, विश्वासघाताच्या आगीत होरपळलेल्या जिवाला तूच घे माय -माऊली बनून कुशीत... दे आता तूच पाठबळ त्याला नवचैतन्याचा टाळ घालून गळ्यात ... वैराग्याच्या भीतीने भेदरलेल्या जिवाच्या भेगाळलेल्या मनाच्या जमिनीवर पडू दे एकदा जिद्दीचा,आत्मविश्वासाचा आषाढी पाऊस... फसलेली नाती , चुकलेल्या वाटा मागे टाकून. .आशेने धरलेल्या नवीन वाटेवर मिळू दे प्रेम, आनंदाने भरलेला वारकरी सहवास.. _sensitive_ink_ ©Dr. BHAGYASHRI

126 View

Trending Topic