Satish Deshmukh

Satish Deshmukh

  • Latest
  • Popular
  • Video

White वाटले होते मला की वाटिका आहे जिंदगी सारी इथे शोकांतिका आहे शेतमालाची फुकट बोली तुम्ही लावा कास्तकाराला कुठे उपजीविका आहे वाटते वाचून घ्यावे मी तुला आता केवढी सुंदर तुझी अनुक्रमणिका आहे भिमरायाचा उजळ माथा बघितल्यावर वाटतो हा सूर्यही आता फिका आहे बारशाचे एवढे कौतुक नको ना रे जन्म माझा तेरवीची पत्रिका आहे ©Satish Deshmukh

#मराठीकविता  White वाटले होते मला की वाटिका आहे
जिंदगी सारी इथे शोकांतिका आहे

शेतमालाची फुकट बोली तुम्ही लावा
कास्तकाराला कुठे उपजीविका आहे

वाटते वाचून घ्यावे मी तुला आता
केवढी सुंदर तुझी अनुक्रमणिका आहे

भिमरायाचा उजळ माथा बघितल्यावर
वाटतो हा सूर्यही आता फिका आहे

बारशाचे एवढे कौतुक नको ना रे
जन्म माझा तेरवीची पत्रिका आहे

©Satish Deshmukh

गजल

15 Love

#मराठीकविता #rajdhani_night  White आजवर कोणत्या सावल्या लागल्या
जिंदगीला उन्हाच्या.. झळा लागल्या

चाललो भार घेवून खांद्यावरी
पालखीला म्हणे ठोकरा लागल्या

जीवनाचे जरी चित्र दुःखामधे
चेहऱ्यावर छटा हासऱ्या लागल्या

जिंदगी आमची केस कोर्टातली
हाय श्वासागणिक हाजऱ्या लागल्या

शेवटी माणसा एवढे सत्य की
लाकडे लागली गोवऱ्या लागल्या

©Satish Deshmukh

#rajdhani_night भर

126 View

#मराठीकविता #simplicity  पसाराच सारा... 
(महानाग / ४०/लगागा /८) 

बियाणे रुजावे बियाणे कुजावे
परत सांधणीचा पसाराच सारा  ! 
अता राहिली ना कृषी फायद्याची
भिके लागणीचा पसाराच सारा  ! 

तणाला किती जोर आला पहा रे
पिकाला जणू सर्प विळखा पडावा
डवरणी-खुरपणी विळे पास शोधा
गवत काढण्याचा पसाराच सारा  ! 

कधी दावणीला कधी सावलीला 
गुरा वासराना सदा घट्ट बांधा
गवत-पेंड चारा दुधाच्या म्हशीला
गुरे राखणीचा पसाराच सारा  ! 

चला रातच्याला जरा जागण्याला
मळ्यावर बसा अन् पुरे लक्ष ठेवा
गवे-रानगाई नि हरणे पिटाळा
फुका जागलीचा पसाराच सारा  ! 

अवेळी तडाखा कधी पावसाचा
उधळतो सुगीचा कसा बेत सारा
झणी गंजलेले विळे धार लावा
पिके कापणीचा पसाराच सारा  ! 

किती कर्ज झाले किती व्याज गेले
खुळे स्वप्न माझे तडीपार झाले
लिहावी पुसावी उधारी कितीदा
उगी लेखणीचा पसाराच सारा  ! 

मुजवली खते अन् फवारे किती ते
खरीपास फटका कधी फोल रब्बी
तयारीस लागा वखर चालवा रे
पुन्हा पेरणीचा पसाराच सारा  !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ

©Satish Deshmukh

psara पसार 2 #simplicity

108 View

#मराठीकविता #IFPWriting  नवी ग़ज़ल.... 

खरे की भाकरी पुरती घरी शेती जरी होती
पिढीला आमच्या कोठे सुखाची नोकरी होती

दिसे समता जरी या कागदावर डोंगरा इतकी
तुझ्या माझ्यात मित्रा केवढी मोठी दरी होती

खुलासा दे कधी होतो व्यवस्थेच्या शिरोभागी
तुझी होती तशी गावात माझी पायरी होती

किती शहरातल्या एसीत माझा जीव गुदमरतो
किती अल्हाददायक गावची ती ओसरी होती

विकाया काढली शेती मुलाने विठ्ठला सारी
तुला माहीत आहे तीच माझी पंढरी होती

© सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. पुसद जि. यवतमाळ
मो. नं. ७०३८२६७५७६

©Satish Deshmukh

#IFPWriting गजल

99 View

#मराठीकविता #Friend  वाहत्या पाण्यात फिरतो गरगरा आहे
जन्म माझाही क्षणाचा भोवरा आहे

फार थकले हे असे बोलू नका कोणी
बाप माझा एक ताजा मोगरा आहे

तू दिला आधार ओठी गोड ओठांचा
याहुनी मोठा कशाचा हादरा आहे

घेउनी बसला विचारांची तिजोरी अन्
नेमका चोरीस गेला चेहरा आहे

जिंकली आकाशगंगा तू जरी होती
कोणत्या विवरात आता मकबरा आहे

हा तुझा मानू नको मुक्काम कायमचा
सोयरा आहे तू येथे सोयरा आहे

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ
मोबाईल नंबर  ७०३८२६७५७६

©Satish Deshmukh

#Friend भोवरा

54 View

उन्हाने तप्त झालेला महासागर तुझ्यामध्ये तरी पाऊस देणाऱ्या ढगांचे घर तुझ्यामध्ये किती उत्साह लोकांचा किती बाजार गजबजले दिवाळीला न पिकलेले मुके वावर तुझ्यामध्ये डबल इंजिन ट्रिपल इंजिन असू द्या आजची सत्ता उद्या मतदान देताना खरी पावर तुझ्यामध्ये तुरुंगाची न ईडीची तुला नाही भिती कुठली कमवली जी स्वकष्टाने अशी भाकर तुझ्यामध्ये तळ्या तुज लागली हल्ली तहानेची सवय कारण तिरावर रोज येणारी वसे घागर तुझ्यामध्ये सतीश देशमुख शेंबाळपिंप्री ता. पुसद जि. यवतमाळ मो. न. 7038267576 ©Satish Deshmukh

#मराठीकविता #titliyan  उन्हाने तप्त झालेला महासागर तुझ्यामध्ये
तरी पाऊस देणाऱ्या ढगांचे घर तुझ्यामध्ये

किती उत्साह लोकांचा किती बाजार गजबजले
दिवाळीला न पिकलेले मुके वावर तुझ्यामध्ये

डबल इंजिन ट्रिपल इंजिन असू द्या आजची सत्ता
उद्या मतदान देताना खरी पावर तुझ्यामध्ये

तुरुंगाची न ईडीची तुला नाही भिती कुठली
कमवली जी स्वकष्टाने अशी भाकर तुझ्यामध्ये

तळ्या तुज लागली हल्ली तहानेची सवय कारण
तिरावर रोज येणारी वसे घागर तुझ्यामध्ये

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. पुसद जि. यवतमाळ
मो. न. 7038267576

©Satish Deshmukh

महासागर #titliyan

12 Love

Trending Topic