आजही मला ते सर्व आठवतयं,
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तिच आयुष्याची मजा घेत,
मित्रांच्या सहवासात रमल्यासारखं
अजुनही मला आठवतंय,
Lecture ला दांडी मारुन
Canteen मध्ये जाऊन बसायचो
पुढच्या Lecture ला मात्र
परत Class कडे वळायचो
Canteen मध्ये कधी कंटाळा आला तर
बाहेरच्या Hotel मध्ये जायचो
Hotel बंद असलं की परत
Canteen मध्येच येऊन गिळायचो..
Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Notes चा साठा जास्त असल्याने
Library कडे कधी वळलोच नाही..
Boring तासाला मागच्या बाकावर
मोबाईलवर Chatting करत बसायचो,
तास संपल्या नंतर एक डुलकी
घेऊनचं उठायचो..
परिक्षेची Date आली कि
मनात एक प्रकारची भिती असायची,
पेपरची तयारी मात्र
आदल्या दिवशीचं करायची..
Traditional Day मध्ये
DJ लावुन नाचायचो,
Class मध्ये सरांनी प्रश्न विचारले कि
खाली मान घालुन गप्प बसायचो,
खुप आठवतात ते दिवस,
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते,
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की,
डोळ्यात टचकन् पाणी येतं..
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here