शिर्षक: मन चंचल पाखरू
--------------
मन चंचल पाखरू
  • Latest
  • Popular
  • Video

शिर्षक: मन चंचल पाखरू -------------- मन चंचल पाखरू कीती आवरू आवरू करू पाहतो बंधीस्थ ; नाही होत काय करू ।। १।। मन मोकळे फिरते जसा वारा सैरभैर मन आनंदी ठेवता ; होई कार्य भरभर ।। २।। काय बोलावे मनास मन भारीच नाठाळ पडे प्रेमात प्रियेच्या ; करी जीवन सकाळ ।। ३।। मन करता दगड दुःख साठवतो मनी वाहे डोळ्यातुन अश्रू ; मन गाई विरहनी ।। ४।। मनी उफाळून येता बघा विकृती सागर तेंव्हा तोडी सारे बंध ; होतो हातून कहर ।। ५।। ठेवा मनास प्रसन्न द्यावी मनाला उभारी तेंव्हा नांदेल मनात ; स्वच्छ निर्मळ श्रीहरी ।।६।। ---------------------- कवी : विशाल एस. नवले "शिवकुमार" ©vishalnavale

#मराठीकविता  शिर्षक: मन चंचल पाखरू
--------------
मन चंचल पाखरू
कीती आवरू आवरू
करू पाहतो बंधीस्थ ;
नाही होत काय करू ।। १।।

मन मोकळे फिरते
जसा वारा सैरभैर
मन  आनंदी ठेवता  ;
होई कार्य भरभर ।। २।।

काय बोलावे मनास
मन भारीच नाठाळ
पडे प्रेमात प्रियेच्या ;
करी जीवन सकाळ ।। ३।।

मन करता दगड
दुःख साठवतो मनी
वाहे डोळ्यातुन अश्रू ;
मन गाई विरहनी  ।। ४।।

मनी उफाळून येता
बघा विकृती सागर
तेंव्हा तोडी सारे बंध ;
होतो हातून कहर ।। ५।।

ठेवा मनास प्रसन्न
द्यावी मनाला उभारी
तेंव्हा नांदेल मनात ;
स्वच्छ निर्मळ श्रीहरी ।।६।।
----------------------
कवी : विशाल एस. नवले "शिवकुमार"

©vishalnavale

शिर्षक: मन चंचल पाखरू -------------- मन चंचल पाखरू कीती आवरू आवरू करू पाहतो बंधीस्थ ; नाही होत काय करू ।। १।। मन मोकळे फिरते जसा वारा सैरभैर मन आनंदी ठेवता ; होई कार्य भरभर ।। २।। काय बोलावे मनास मन भारीच नाठाळ पडे प्रेमात प्रियेच्या ; करी जीवन सकाळ ।। ३।। मन करता दगड दुःख साठवतो मनी वाहे डोळ्यातुन अश्रू ; मन गाई विरहनी ।। ४।। मनी उफाळून येता बघा विकृती सागर तेंव्हा तोडी सारे बंध ; होतो हातून कहर ।। ५।। ठेवा मनास प्रसन्न द्यावी मनाला उभारी तेंव्हा नांदेल मनात ; स्वच्छ निर्मळ श्रीहरी ।।६।। ---------------------- कवी : विशाल एस. नवले "शिवकुमार" ©vishalnavale

9 Love

Trending Topic