English
vishalnavale
171 View
Thursday, 11 April | 04:12 pm
0 Bookings
काय लिहावे जीवना सांग तुझ्यावर आता कशी सांगावी जगाला ; मनातील दुःख कथा ।। १।। जीवनाच्या प्रवासात दुःख काटे टोचतात आशा आकांशाचे इथ दीप बघा विझतात ।। २।। मनी योजलेली गोष्ट होत नाही कधी सत्य माणसांच्या बाजारात जाई विकल्या असत्य ।। ३।। झाले कठीण जगणे किती मरण ते स्वस्थ दुःख झळा देण्यासाठी ; काळ झाला बघा व्यस्त ।। ४।। सारे इथं कठपुतली असे मनुष्य लाचार किती झेलायचे पाठी ; दुःख वेदनेचे वार ।। ५।। नाही राहो मनी खंत नांदो जीवनी आनंद पुन्हा सुटावा जीवनी सुख कस्तुरिचा गंध ।।६।। 🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧 कवी : विशाल शिवाजी नवले "शिवकुमार" ©vishalnavale
10 Love
संकटमोचन... बजरंगबली । अंजनीचा सुत । श्रीरामाचा दूत। हनूमान ।।१।। महापराक्रमी । बाल ब्रह्मचारी । संकटात निवारी । महाबली ।।२।। संकटमोचन । केसरी नंदन । करूया वंदन । रामभक्त ।।३।। प्रभूपदी लीन । राम रसायन । करूनी प्राशन । चिरंजीव ।।४।। क्षणात जाळली । सुवर्णाची लंका । वाजविला डंका । चमत्कारी ।।५।। सौ.शरयु पाम्पट्टीवार. ©vishalnavale
11 Love
9 Love
शिर्षक: मन चंचल पाखरू -------------- मन चंचल पाखरू कीती आवरू आवरू करू पाहतो बंधीस्थ ; नाही होत काय करू ।। १।। मन मोकळे फिरते जसा वारा सैरभैर मन आनंदी ठेवता ; होई कार्य भरभर ।। २।। काय बोलावे मनास मन भारीच नाठाळ पडे प्रेमात प्रियेच्या ; करी जीवन सकाळ ।। ३।। मन करता दगड दुःख साठवतो मनी वाहे डोळ्यातुन अश्रू ; मन गाई विरहनी ।। ४।। मनी उफाळून येता बघा विकृती सागर तेंव्हा तोडी सारे बंध ; होतो हातून कहर ।। ५।। ठेवा मनास प्रसन्न द्यावी मनाला उभारी तेंव्हा नांदेल मनात ; स्वच्छ निर्मळ श्रीहरी ।।६।। ---------------------- कवी : विशाल एस. नवले "शिवकुमार" ©vishalnavale
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here