काय  लिहावे जीवना
 सांग तुझ्यावर आता
 कशी सांगावी
  • Latest
  • Popular
  • Video

काय लिहावे जीवना सांग तुझ्यावर आता कशी सांगावी जगाला ; मनातील दुःख कथा ।। १।। जीवनाच्या प्रवासात दुःख काटे टोचतात आशा आकांशाचे इथ दीप बघा विझतात ।। २।। मनी योजलेली गोष्ट होत नाही कधी सत्य माणसांच्या बाजारात जाई विकल्या असत्य ।। ३।। झाले कठीण जगणे किती मरण ते स्वस्थ दुःख झळा देण्यासाठी ; काळ झाला बघा व्यस्त ।। ४।। सारे इथं कठपुतली असे मनुष्य लाचार किती झेलायचे पाठी ; दुःख वेदनेचे वार ।। ५।। नाही राहो मनी खंत नांदो जीवनी आनंद पुन्हा सुटावा जीवनी सुख कस्तुरिचा गंध ।।६।। 🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧 कवी : विशाल शिवाजी नवले "शिवकुमार" ©vishalnavale

#मराठीकविता  काय  लिहावे जीवना
 सांग तुझ्यावर आता
 कशी सांगावी जगाला  ;
 मनातील दुःख कथा ।। १।।

 जीवनाच्या  प्रवासात
 दुःख काटे टोचतात
 आशा आकांशाचे इथ  
 दीप बघा विझतात ।। २।।

 मनी योजलेली गोष्ट
 होत नाही कधी सत्य
 माणसांच्या बाजारात
 जाई विकल्या असत्य ।। ३।।

 झाले  कठीण जगणे
 किती  मरण ते स्वस्थ
 दुःख झळा देण्यासाठी ; 
 काळ  झाला बघा व्यस्त ।। ४।।

 सारे इथं कठपुतली
 असे मनुष्य लाचार
 किती झेलायचे पाठी ;
 दुःख वेदनेचे वार ।। ५।।

 नाही राहो मनी खंत 
 नांदो जीवनी आनंद 
 पुन्हा सुटावा जीवनी
 सुख कस्तुरिचा गंध  ।।६।।

🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧

 कवी : विशाल शिवाजी नवले "शिवकुमार"

©vishalnavale

काय लिहावे जीवना सांग तुझ्यावर आता कशी सांगावी जगाला ; मनातील दुःख कथा ।। १।। जीवनाच्या प्रवासात दुःख काटे टोचतात आशा आकांशाचे इथ दीप बघा विझतात ।। २।। मनी योजलेली गोष्ट होत नाही कधी सत्य माणसांच्या बाजारात जाई विकल्या असत्य ।। ३।। झाले कठीण जगणे किती मरण ते स्वस्थ दुःख झळा देण्यासाठी ; काळ झाला बघा व्यस्त ।। ४।। सारे इथं कठपुतली असे मनुष्य लाचार किती झेलायचे पाठी ; दुःख वेदनेचे वार ।। ५।। नाही राहो मनी खंत नांदो जीवनी आनंद पुन्हा सुटावा जीवनी सुख कस्तुरिचा गंध ।।६।। 🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧 कवी : विशाल शिवाजी नवले "शिवकुमार" ©vishalnavale

10 Love

Trending Topic