काय तो विठ्ठल, काय ती पंढरी
काय तो जयघोष, माऊली माऊली ।।
काय ते देहू, काय ती आळंदी
काय ती भक्ती, अन भक्तीसागर ।
काय ती वारी, काय वारकरी
काय ते भजन, टाळ चिपळ्यांचे ।
काय तो घोडा, काय ते रिंगण
काय ते नाम, विठ्ठल विठ्ठल ।
काय ती माऊली, काय ती लेकरं
काय तो गजरं, श्रीराम कृष्ण हरी ।
काय ती चंद्रभागा, काय तो प्रवाह
काय ते मंदिर, विठू माऊलीचे ।
काय तो विठ्ठल, काय ती पंढरी
काय तो जयघोष, माऊली माऊली ।।
©Shubham Bagal
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here