Alone भीमा तुझ्या मताचे
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते.
वाणीत भीम आहे, करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते.
गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते.
तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते.
सदभाव एकतेचे जर अंतरात असते
चुकले कुणीही नसते सारेच एक असते.
वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझिया क्रुतिप्रमाणे सारेच नेक असते
- लोकशाहीर वामनदादा कर्डक
©pravin fulzele
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here